नागपूर - केवळ काही महिन्यांच्या स्वतःच्या मुलाला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. अंबाझरी पोलिसांनी त्या आईवर कलम ३२३ भादंवि सहकलम ७५ जुव्हेनाईल जस्टीस ऍक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. एवढंच नाही तर पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेऊन तिला सूचनापत्र देण्यात आले आहे. पोलिसांकडून अल्पवयीन पीडित बालकाच्या सुरक्षेसाठी बालकास बाल न्याय मंडळासमक्ष हजर करण्यात येणार आहे.
माहिती देताना पोलीस उपायुक्त विनिता साहू पोटच्या मुलावर सर्वाधिक प्रेम करणारी आई सर्वांनी बघितली आणि अनुभवली आहे, पण आज आईची क्रूरता दाखवणारा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला, ज्यामुळे नागपूरकरांच्या काळजाचा थरकाप उडाला. या व्हायरल व्हिडिओत एका महिलेचा सासूसोबत सुरू असलेला वाद दिसून येतो. या दरम्यान ती निर्दयी आई आपल्याच बाळाला अतिशय निर्दयी आणि क्रूरपणे मारहाण करताना दिसून येते.
- पोलिसांनी दाखवली तत्परता -
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी देखील तत्परता दाखवत तत्काळ तपास करण्याचे निर्देश दिले होते. पोलीस स्टेशनला कर्तव्यावर हजर पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी व्हिडिओची सत्यता पडताळणी केली असता पांढराबोडी येथे राहणारी एक महिला आपल्याच बाळाला बेदम मारहाण करत असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन पोलिसांनी कोणताही वेळ न घालवता तत्काळ दखल घेत पीडित बाळास रेस्क्यू केले. सदर घटना आठ दिवसांपूर्वीची आहे. मारहाण झालेले बाळ सुखरूप असल्याचे खात्री पटवण्यात आली. त्यानंतर त्या आईसह कुटुंबातील लोकांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच बाळासंबंधाने कायदेशिर कर्तव्ये, जवाबदारी व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एनजीओला बोलावण्यात आले होते.
व्हिडिओ बातमी बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -
Most Brutal Video : नागपुरात सासू-सुनेच्या भांडणात चिमुकल्याला आपटले, बेदम मारले, गळाही दाबला