महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चौकशी समितीचा अंतिम अहवाल अद्याप पेंडिंग

दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर चौकशी समितीने अहवाल अद्याप सादर केला नसल्याची माहिती वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी दिली आहे.

Deepali Chavan
दिपाली चव्हाण

By

Published : Sep 3, 2021, 3:26 PM IST

नागपूर - वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर चौकशी समिती गठित करण्यात आली होती. मात्र, या समितीने अहवाल अद्याप सादर केला नसल्याची माहिती वन विभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी दिली आहे. समितीच्या अध्यक्षांनी या प्रकरणातील दोन्ही अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप अहवाल तयार झाला नसल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा -दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, बदलीसाठी पैसे घेणारा तो नेता कोण?

याप्रकरणात चौकशी समितीचे अध्यक्ष अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक एम के राव हे होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी निवृत्त होण्यापूर्वी एक अहवाल हा बनबल प्रमुख जी साई प्रकाश यांना दिला अशी चर्चा आहे. या अहवालात दिपाली चव्हाण प्रकरणात आरोप असलेले उप वनसंरक्षक विनोद शिवकुमार आणि अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम एस रेड्डी या दोघांचा दोष नाही असे अहवालात नमूद केले असल्याचे बोलले जात आहे. इतर सदस्यांच्या त्यावर सह्या नाहीत असेही सांगण्यात येत आहे. पण या संदर्भात वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांना भेटी दरम्यान विचारले असतांना, अंतिम अहवाल देण्यात आला नाही असे त्यांनी सांगितले. तसेच चौकशी समितीचे अध्यक्ष एम. के राव यांनी अहवाल दिला नसून, आतापर्यंत केलेल्या कामकाजाची नोट दिली अशीही माहिती विकास गुप्तां यांनी दिली आहे.

  • चौकशी समितीचे अध्यक्ष कोण असणार?

यात व्ही के राव हे सेवानिवृत्त झाल्याने आता चौकशी समितीचे अध्यक्ष कोण असणार हे अजून स्पष्ट झाले नाही. या समितीचे अध्यक्ष म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक एम के राव यांची फेरनिवड होणार का? याकडेही लक्ष लागले आहे. वनबल प्रमुख जी. साई प्रकाश हे या संदर्भात अंतिम निर्णय घेतील. त्यानंतर चौकशी समितीचे कामकाज पुन्हा सुरू होईल. यात एम. के. राव यांची निवड होणार का? हे सुद्धा पाहावे लागणार आहे. यात चौकशी समितीचे इतर सदस्यांचेही मत महत्वाचे असणार आहे. त्यामुळे इतर सदस्य नेमके काय निर्णय समितीच्या माध्यमातून घेणार आणि दिपाली चव्हाण प्रकरणात काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

  • काय आहे अहवालाची चर्चा?

चौकशी समितीचे अध्यक्ष एम. के. राव यांनी अहवाल दिला या चर्चेमुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी मनोबल खचल्याने आत्महत्या केली आहे. यामुळे दोषारोप असलेले दोन्ही अधिकारी निर्दोष आहेत, असे अहवालात नमूद केल्याची चर्चा आहे. सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी हा अहवाल दिल्याचे बोलले जात आहे. पण हा अहवाल अंतिम नसून एक नोट दिली असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. यामुळे या नोटमध्ये काय लिहिले आहे हे अद्याप स्पष्ट नाही.

हेही वाचा -मेळघाट; हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण यांची आत्महत्या

  • हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण यांची आत्महत्या -

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दिपाली चव्हाण या वनअधिकारीं महिलेने आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 25 मार्च रोजी सायंकाळी घडली. आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details