महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूरमध्ये गजबजलेल्या परिसरात महिलेवर प्राणघातक हल्ला - नागपूरमध्ये महिलेवर प्राणघातक हल्ला

नागपूर शहरातील रामदासपेठ परिसरातील कॅनॉल रोडवर भर दुपारी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी महिलेवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू..

नागपूरमध्ये गजबजलेल्या परिसरात महिलेवर प्राणघातक हल्ला

By

Published : Nov 11, 2019, 4:49 PM IST

Updated : Nov 11, 2019, 7:00 PM IST

नागपुर -शहरातील कॅनॉल रोड हा सततच्या रहदारीमुळे गजबजलेला परिसर असतो. यातच भर दुपारी महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोनाली तोटे असे जखमी महिलेचे नाव आहे.

नागपूर शहरातील रामदासपेठ परिसरातील कॅनॉल रोडवर भर दुपारी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला..

हेही वाचा... बीडजवळ बोलेरो-ट्रकचा भीषण अपघात.. दोन महिलांसह ७ जण ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला शहरातील रामदासपेठ भागात काम करत असे. तिची ऑफिसला जाण्याची वेळ आरोपीला महिती होती आणि दुपारच्या सुमारास आरोपीने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. आरोपी हा महिलेच्या ओळखीचा असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच हल्ल्यात जखमी महिलेवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा... अरविंद सावंत यांनी दिला केंद्रीय अवजड मंत्रिपदाचा राजीनामा

Last Updated : Nov 11, 2019, 7:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details