महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शेतकऱ्यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्राच्या निधीचा लाभ घ्यावा - मंत्री सुनील केदार - नागपूर सुनील केदार बातमी

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवत 112 कुटुंबाना ही मदत रविवारी वाटप करण्यात आली. यावेळी राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.

savner apmc help to farmer
शेतकऱ्यांनी पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्राच्या निधीचा लाभ घ्यावा - मंत्री सुनील केदार

By

Published : Jun 20, 2021, 6:07 PM IST

नागपूर -सावनेर तालुक्यात साधारण 325 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यामध्ये बहुतांश हे शेतकरी कुटुंबातील आहेत. या कठीण प्रसंगात शेतकरी कुटुंबाना आधार देण्यासाठी मदतीचे एक पाऊल सावनेर कृषी उतपन्न बाजार समितीने उचलले आहे. या कुटुंबाना मदत म्हणून पैसे देण्याऐवजी खरीप हंगामासाठी लागणारी शेती निविष्ठा देण्यात आली आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवत 112 कुटुंबाना ही मदत रविवारी वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी व्यावसायिक, उद्योजक व संस्थानी केंद्राच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.

प्रतिक्रिया

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बाजार समितीची योजना -

कोरोनामुळे कुटुंबातील मुख्य व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. अनेकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. या कुटुंबाना मदत देण्यासाठी पशुसंवर्धन मंत्री केदार यांच्या संकल्पनेतून सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे 112 कुटुंबांना प्रत्येकी तुरीचे बियाणे, युरियाच्या दोन बॅग आदी मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. यासोबतच तालुक्यातील कृषी दुकानदारांनीसुद्धा या कुटुंबाना एक छोटीशी मदत म्हणून कपाशीचे बियाण्याचे पॅकेट मोफत देऊन हातभार लावला आहे. याचे कौतुकही मंत्री केदार यांनी केले.

हेही वाचा -मराठा आरक्षणासाठी विनोद पाटलांची सर्वोच्च न्यायालयात धाव, पुनर्विचार याचिका दाखल

'उद्योजक व संस्थानी केंद्राच्या योजनेचा लाभ घ्यावा' -

यावेळी बोलताना 'हा उपक्रम शेतकरी कुटुंबाचे झालेले नुकसान भरून काढणारे नाही. पण या परिस्थितीत कोणीही एकटे नाही हा संदेश देणारा हा उपक्रम आहे. आपण सोबत आहोत, हे सांगण्यासाठीचा हा उपक्रम आहे', अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. तसेच राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे.

उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलत -

पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीची योजना शासनाने जाहीर केली आहे, अशी माहिती केदार यांनी दिली. केंद्र शासनाने गेल्या वर्षी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी दिली. मात्र, या योजनेचा १५ हजार कोटींची निधी या वर्षी (२०२१-२२) देण्यात आला आहे. या विविध योजनांतर्गत दूध प्रक्रिया (आइस्क्रीम, वीजनिर्मिती, दूध पाश्चरायजेशन, दूध पावडर, इत्यादी), मांसनिर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटीन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, व्याज दरामध्ये ३ टक्के सूट देण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.

शुद्ध वंशावळीच्या प्रजातींच्या संवर्धनाचा समावेश -

विविध उद्योग व्यवसायासोबतच लिंग विनिश्चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्य फलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केलेला आहे. या योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, स्थापन झालेली कंपनी यांना लाभ घेता येणार असल्याचेही केदार यांनी सांगितले.

हेही वाचा - प्रताप सरनाईकांच्या पत्रातील आरोप गंभीर; सर्वांनी त्याचा अभ्यास करावा - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details