नागपूर - जिल्ह्यात सावनेर तालुक्यातील वाकोडी गावात एका 65 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अरुण खुशाल कान्होळकर असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
कर्जबाजारीपणामुळे नागपूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या... हेही वाचा... ऐकावं ते नवलच... चक्क वडाच्या झाडाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड !
प्राप्त माहितीनुसार, अरुण कान्होळकर यांच्यावर युनियन बँकेचे एक लाखाचे कर्ज होते. जे थकीत व्याजाची रक्कम पकडता, दोन लाखांच्यावर गेले होते. अरुण यांनी सुरवातीला कर्जाचे नियमित हफ्ते भरले. मात्रं त्यानंतर त्यांना हफ्ते भरता आले नाही, त्यामुळे कर्ज थकीत झाले. त्यानंतर अरुण यांनी एका सावकाराकडे घरातील दागिने गहाण ठेऊन काही दिवस बँकेतील कर्जाचे हफ्ते फेडले. मात्र, नागपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीने त्यांच्या कापसाच्या पिकाची मोठी नासाडी झाली. तेव्हापासूनच अरुण कान्होळकर हे तणावात होते. त्यामुळे काल रात्री संपूर्ण कुटुंब झोपी गेल्यानंतर त्यांनी घरातील एका खोलीत जाऊन गळफास घेत, आत्महत्या केली. सकाळी घरातील इतर सदस्य जागे झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा... 'माझे वक्तव्य विवादित नाही, जे इतिहासात आहे तेच जनतेसमोर मांडतोय'