नागपूर - दरवर्षी प्रमाणे यंदाही नागपूरचा राजा म्हणून ओळख असलेल्या तुळशीबागेतील गणरायाचा निरोप देण्यात आला आहे. यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साजरे करण्याला मर्यादा आल्या आहेत. यंदाही मूर्तीची भव्यता आणि थाट मात्र कमी असला तर भक्तीमय वातवरणात बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. कोराडी येथे बाप्पाचे विधीवत विसर्जन करण्यात आले आहे.
नागपूरच्या राजाला साध्या पद्धतीने निरोप - नागपूरचा राजा
तुळशीबागेतील नागपूरचा राजाची मनोभावे पूजा केली जाते. दरवर्षी दहा दिवस फुलांची आरास, भव्य दिव्या हजारोच्या गर्दीत ढोल तशासह उंट घोडे अश्या थाटात मिरवणूक काढली जाते. पण कोरोनामुळे प्रशासनाची नियमावली असल्याने त्याचे काटेकोर पद्धतीने पालन करण्यात आले.
![नागपूरच्या राजाला साध्या पद्धतीने निरोप nagpurcha raja](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13109979-257-13109979-1632054554018.jpg)
नागपूरच्या राजाला भावपूर्ण निरोप
नागपूरचा राजा दरवर्षी फुलांची आरास ही देखणी असते. गणपतीसाठी दहा दिवस भाविक दर्शनासाठी गर्दी करत असते. लोकांनी गर्दी करू नये यामुळे मोजक्याच लोकांसह बाप्पाला निरोप देण्यात आला. निरोप देण्यापूर्वी पूजा करण्यात आली. त्यानंतर त्याला कोरडीच्या दिशेने रवाना झाला आहे. यात कोरोनाच्या संकट टळू दे असे साकडे गणरायाला नागपूरच्या राजाला करण्यात आले. कोरडी नदीत क्रेनच्या सहाय्याने नदीत विसर्जन करण्यात आले.
हेही वाचा -पुढच्या वर्षी लवकर या! देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील घरी बाप्पाला निरोप