नागपूर - तहसील पोलीस स्थानकाच्या हद्दीतील आधारकार्ड केंद्रावर बनावट आधारकार्ड तयार करण्यात येत असल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला आहे. आधारकार्ड बनवणारे केंद्र अधिकृत असले, तरीही चुकीच्या पद्धतीने कार्ड तयार केल्याचे उघड झाल्याने तहसील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्या दोघांना अटक; नागपूर पोलिसांची कारवाई - आधारकार्ड केंद्र नागपूर
आधारकार्ड बनवणारे केंद्र अधिकृत असले, तरीही चुकीच्या पद्धतीने कार्ड तयार केल्याचे उघड झाल्याने तहसील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

आधारकार्ड बनवणारे केंद्र अधिकृत असले, तरीही चुकीच्या पद्धतीने कार्ड तयार केल्याचे उघड झाल्याने तहसील पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
आधारकार्ड तयार करताना केंद्र संचालकाच्या अंगठ्याचा ठसा घ्यावा लागलो. मात्र, या ठिकाणी चक्क रबराचा ठसा तयार करून आधारकार्ड तयार केले जात होते. संबंधित कारवाई तहसील पोलीस स्थानकाच्या हंसापुरी भागातील एका शाळेत करण्यात आली आहे.
या छाप्यात पोलिसांनी आधारकार्ड सह स्टॅम्प, प्रिंटर तसेच स्कॅनर जप्त केले आहेत. चंद्रकांत पराते आणि तुषार फुलचंद हेडावू या दोघांविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील कारवाई चालू आहे.