महाराष्ट्र

maharashtra

बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध नाही पण... - देवेंद्र फडणवीस

By

Published : Jan 25, 2021, 3:48 PM IST

नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. या नामकरणाला नागपुरातील अनेक आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे. या संदर्भात भाजपने देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

नागपूर -नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर’ असे करण्यात आले आहे. या नामकरणाला नागपुरातील अनेक आदिवासी संघटनांनी विरोध केला आहे. या संदर्भात भाजपने देखील काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आमचा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही, मात्र नामकरण करताना लोकांना विश्वासात घ्यावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यात आमचं सरकार होत तेव्हा आम्ही गोरेवाडा प्राणी संग्रहालयाचा विकास व्हावा म्हणून निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर सगळ्या आदिवासी संघटनांनी माझी भेट घेतली होती. त्यावेळी गोरेवाडा प्राणी संग्रहालययाला गोंडवाना असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना मी सांगितलं होतं काम पूर्ण होईपर्यंत नाव देता येत नाही, मात्र काम पूर्ण झाल्यानंतर गोंडवाना असे नामकरण करू. मात्र सरकार बदललं त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले, त्याला आदिवासी संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध नाही पण...

बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध नाही

बाळासाहेबांच्या नावाला आमचा विरोध नाही, पण कुठं आणि किती ठिकाणी नाव द्यायचं हे या सरकारने ठरवून घेतलं पाहिजे. पक्ष म्हणून आमचा बाळासाहेबांच्या नावाला कुठलाही विरोध नाही. कुठलंही नाव देताना सल्ला मसलत न करता देणं आनी मग त्याला विरोध होणं योग्य नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊनच नाव दिले पाहिजे, माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी प्रोटोकॉल ठरवावा की कुठे नाव देता येते आणि कुठे नाही. बाळासाहेबांच्या नावाला विरोध होणे शोभणारे नाही, त्यामुळे सरकारने या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे, असेही यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -'शेतकरी महिलांना उद्ध्वस्त करणारा कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत हटणार नाही'

हेही वाचा -शेतकऱ्यांचा 'विराट' मोर्चा : डॉ. नवले यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ची खास बातचित

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details