नागपूर: गुन्हेगारीच्या प्रत्येक बाबतीत राज्यातील इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या तुलनेत सर्वात पुढे असलेल्या, नागपुरातील गुन्हेगारांनी आता थेट पोलीस आणि न्यायव्यवस्थेलाचं आवाहन देत हद्दच पार केली आहे. गुन्हेगाराला न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सॉलवेंसी (बाँड) तयार करावा लागतो, त्यासाठी लागणारे महत्वाचे कागदपत्रे म्हणजेचं दस्तावेज (डॉक्युमेंट) बोगस तयार करण्यात ( Exposing a gang that helps criminals ) येत, असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे नागपुरात गुन्हेगार थेट न्याय व्यवस्थेची फसवणूक करत होते. या संदर्भात नागपूर गुन्हेशाखा पोलिसांना गुप्त माहिती समजली होती, त्या आधारे पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू असल्याने शेकडो गुन्हेगार बोगस सॉलवेंसीचा आधार घेऊन मोकाट झाले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेकडो आधार कार्डसह बनावट सॉलवेंसी, रेशन कार्ड आणि इतर ही महत्वाचे समजले जाणारे दस्तऐवज जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या आधार कार्डवर एकाच माणसाचा फोटो आहे. मात्र, त्याचे नाव वेगवेगळे आहेत. आधार कार्डचा क्रमांक ही वेगवेगळा आहे. इतर कोणाचे आधार कार्ड आणि आधार नंबर वापरून, त्यावर फोटो शॉप सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून, फोटो मात्र दुसर्याच व्यक्तीचा लावण्यात आलाय. याच पद्धतीने नागपुरात काही गुन्हेगारांनी कोर्टातून जामीन मिळवल्यानंतर कोर्टाच्या नियमाप्रमाणे बोगस सॉलवेंसी (बाँड) भरण्यासाठी बोगस दस्तावेजच ( creating duplicate documents ) तयार केले नाहीत ना, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने जिल्हा व सत्र न्यायालयासमोर कारवाई केली आहे. या प्रकरणी सुनील सोनकुसरे आणि सतीश शाहू या दोघांना अटक केली आहे.