नागपूर - पत्नीच्या खून प्रकरणी आरोपी पतीने घटनास्थळावर नसल्याचा दावा करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिगारेटच्या एका छोट्या तुकड्याने त्याला आजन्म कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरवले. कुठलाही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना पोलिसांच्या तपासातील परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या द्विसदस्यीय बेंचने हा निकाल दिला आहे. जिथे अनेक खुनाचा प्रकरणात प्रत्यक्षदर्शी नसल्याने गुन्हे करत मोकाट सुटतात, पण याप्रकारणात छोट्याशा चुकीमुळे गुन्ह्यास पात्र ठरला आहे. यामुळे 'कानून के नजरसे कोई नई बच सकता' हे पुन्हा सिद्ध झाले.
डीएनए चाचणीच्या अहवालाने झाले स्पष्ट
अनेकदा चित्रपट आणि कथानकामध्ये पुरावे गोळा करताना पोलीस आणि सीआयडीमध्ये आपण पाहिले असतील. पण हे पुरावे किती म्हत्वावचे ठरू शकतात हे चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारशाच्या खुनाचा प्रकरणात समोर आले आहे. महिलेची हत्या पतीनेच केली हे कोणीही प्रत्यक्षदर्शी नव्हते. पण घटनास्थळी पंचनामा करताना मिळालेल्या सिगारेटच्या तुकड्यावर असलेला थुंकी आणि आरोपी पतीचा नमुने घेऊन डीएनए चाचणीच्या अहवालाने हत्येच्या दिवशी तो घटनास्थळी नव्हता हा दावा खोटा ठरला.
काय होती खुनाची घटना
(2015)मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह येथे मृतक सविता रमेश जावळे यांना तिचा पुतण्या हा फोन लावत असताना त्या उचलत नव्हत्या. जेव्हा त्याने घरी जाऊन पाहिले तेव्हा घराच्या चाव्या खिडकीत होत्या. दरम्यान, त्याने खिडकीतून पाहिले असताना सविता या निपचित रक्तबंबाळ अवस्थेत पडून होत्या. त्याने पोलिसांना फोन केला. बल्लारशाहचे पोलीस अधिकारी रेवचंद सिंघनजुडे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह पोहचहले. घटनास्थळी खिडकीतून चाव्या घेत दरवाजा उघडत संपूर्ण चौकशी सुरू केली. घटनास्थळी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी मिळून आली. या दोन चिठ्ठीत पती-पत्नी दोघांनी आत्महत्या करण्याचा विचार असल्याचे लिहले होते. पण या दोन्ही चिठ्या आरोपी पतीनेच लिहल्याचे सिद्ध झाले. या ठिकाणी एक गळफास दोर लटकत होता. तर, येथेच पत्नीच्या डोक्यावर लाकडी काठीने जबर मारहाण केल्याने रक्तबंबाळ होऊन मृतावस्थेत ती पडून होती.
एक सिगरेटचा तुकडा ठरला खुनाचा प्रत्यक्ष साक्षीदार
यावेळी घरात फार काही ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यावेळी येथे एक सिगरेटचा तुकडा, दोन चिठ्या मिळून आल्या. तेथेच चहा पिल्याचा कपही होता. दरम्यान, आपण त्यादिवशी घरी नव्हतो तर नागपुरला होतो असा दावा सविताचा पती रमेश जावळे याने केला होता. त्याने तसे काही पुरावे देण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना त्यावर संशय होता. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला असताना त्याला अटक करण्यात आली. यावेळी रक्ताचे माखलेले कपडे मिळाले. जे त्याने रेल्वे स्थाकांच्या खंडर असलेल्या घरात लपून ठेवले होते. यावरून कपड्यावरचे रक्त, चहाचा कप आणि सिगारेटचा तुकडा याची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये पतीनेच खून केल्याचे समोर आले आहे. यामध्ये सिगरेटचा तुकडाच महत्वाचा ठरला असे तत्कालीन तपास अधिकारी रेवचंद सिंघनजुडे यांनी ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.