Subhash Chandra Bose Jayanti 2022 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नागपूरशी राहिलेले नाते... - सुभाषचंद्र बोस नागपूर कनेक्शन
स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती (Subhash chnadra bose Jayanti 2022) आहे. त्यानिमित्ताने त्यांचे नागपूर कनेक्शन (Bose Nagpur Connection) आणि नागपुरातील काही लोकांचे असलेले घनिष्ट संबंध हे जाणून घेऊ या खास रिपोर्ट मधून...
नागपूर - स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचे नेते नेताजी सुभाष चंद्र बोस यांची आज जयंती (Subhash chnadra bose Jayanti 2022) आहे. त्याकाळातील हुशार पहिले आसीएस झालेले सुभाषचंद्र बोस यांच लोकांवर प्रभाव प्रचंड आकर्षण होते. सुरवातीच्या काळात काँग्रेसमध्ये असताना देशभरात त्यांना फिरावं लागायचे. तसंच उपराजधानी नागपूर म्हणजे तत्कालीन सीपी अँड बेरार प्रांत असलेल्या मध्यप्रदेशचा भाग इथे सुद्धा त्यांना यावे लागायचे. त्यांचे नागपूर कनेक्शन (Bose Nagpur Connection) आणि नागपुरातील काही लोकांचे असलेले घनिष्ट संबंध हे जाणून घेऊ या खास रिपोर्ट मधून...
सुभाषचंद्र बोस हे आयसीएस झाले. पण गांधीजींच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी इंग्रजांची नौकरी सोडून कॉंग्रेसमध्ये आले. त्याकाळात वर्ध्याचे सेवाग्राम येथील आश्रमात होणाऱ्या महत्वाच्या बैठकीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नेहमी ये जा असायची. त्याच काळात त्यांची भेट नागपूर येथील उच्चशिक्षित इंजिनियर असलेले मंचरशाह आव्हारी यांच्याशी होत. पण तोपर्यंत मंचरशाह आव्हारी हे गांधीजींना जोडलेले एक काँग्रेसचे युवा पदाधिकारी होते. पण ते माहात्मा गांधीजीसोबत सुभाषचंद्र बोस यांच्यापासून प्रेरित झाले होते. काँग्रेसमधून जेव्हा सुभाचंद्र बोस हे बाहेर पडले आणि त्यांनी आझाद हिंद सेना स्थापन केली. पण याची प्रेरणा त्यांना जनरल मंचरशाह आव्हारी यांच्यापासून मिळाली. व्हॉलेंटियर्सची रिपब्लिकन आर्मीचा ड्रेसकोड हा आझाद हिंद सेनेपासून काही बदल करत स्वीकारला असल्याचे जनरल आव्हारी याचे पुत्र तथा नागपूरचे माजी खासदार गेव्ह आव्हारी यांनी याबद्दल ईटीव्हीशी बोलतांना सांगितले.
कोण होते जनरल आव्हारी
जनरल आव्हारी 1923 मध्ये हे नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष झाले. व्हॉलेंटियर्सची रिपब्लिकन आर्मी म्हणजेच प्रजासत्ताक सेना मंचरशाह आव्हारी स्थापन केली. त्यांनी स्थापन केलेली ही सेना त्या काळात खूप गाजली. तसेच मंचरशा आव्हारी यांनी झेंडा सत्याग्रह करत सीताबर्डी येथील इंग्रजांचा झेंडा खाली उतरवल्याने त्यांचे आंदोलन प्रचंड गाजले. त्यामुळे आव्हारी यांचे आंदोलन गाजले होते. आव्हारी बदलले हे समजल्याने सुभाषचंद्र बोस हे सुद्धा आव्हारी यांच्यापासून प्रेरित झाले. त्या काळात नागपूर नगर परिषदेचे अध्यक्ष सी. बी पारेख यांनी 1928 मध्ये सुभाषचंद्र बोस यांना सांगण्यावरून नागपूरमध्ये आले. त्यावेळी त्याचे स्वागत करण्यात आले. पण आव्हारी यांच्याशी भेट झाली नाही. कारण जनरल मंचरशाह आव्हारी हे आंदोलनामुळे कारागृहात होते असेही गेव्ह आव्हारी यांनी सांगितले.
आझाद हिंद सेनेचे प्रेरणा.
1931सुमारास सुभाष चंद्र बोस आणि जनरल आव्हारी यांची भेट झाली. तेव्हा बोस यांनी त्यांचा प्रजासत्ताक आर्मी बद्दल आणि आव्हारी यांचे इंग्रजांविरोधात असलेल्या दारुगोळा बनवण्याची संपूर्ण पद्धत जाणून घेतली. खादी शर्ट पॅन्ट, गांधी टोपी आणि कमलरेला बेल्ट, त्याला लटकवत एक तलवार, पायात लांब बूट असा पेहराव होता. अहिंसेच्या मार्गवर असलेली सेना तलवार घेऊन असल्याने वादंग उठले होते. पण हाच ड्रेसकोड ज्यामध्ये सैनिकी गणवेश, बूट, कमरेला बंदूक, डोक्यावर स्टार असलेली टोपी होती. 'तुंम मुझे खून दो मैं तुमहें आझादी दुगा' चा नारा गाजला. सुभाषचंद्र बोस यांनीही मंचरशाह आव्हारी यांच्यापासून प्रेरणा घेत सेना आणि गणवेश घेतल्याचे भाषणातही बोलून दाखवल्याची माहिती गेव्ह आव्हारी यांनी दिली.
फॉरवर्ड ब्लॉकची घोषणाही नागपुरातच झाली
सुभाचंद्र बोस यांनी मतभेद झाल्याने काँग्रेस सोडली. त्यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना नागपूरात चिटणीस पार्कवर झालेल्या सभेत केली होती. त्यावेळचे कामगार केसरी म्हणुन ओळख असलेले रामभाऊ रुईकर यांच्याशी मैत्रीपूर्ण संबध असल्याने ते नागपूरात यायचे. तेव्हा मिरवणूक हत्ती घोड्या वरून काढण्याची पद्धत होती. त्यांची मिरवणुकही तशीच काढण्यात आली होती. यासोबत सुभाषचंद्र बोस हे अनेकदा नागपुरात आल्याचे जुने जाणकार अभ्यासक मंडळी सांगतात.
हेही वाचा -नेताजी बोस यांच्यासोबत नेमके काय झाले होते? हे जाणून घेण्याचा लोकांना अधिकार - ममता बॅनर्जी