नागपूर - उपराजधानी नागपूर हे ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Energy Minister Nitin Raut ) यांचे शहर आहे. याच शहरातील उत्तर नागपूर मतदारसंघातून ते येतात. नुकत्याच ईटीव्ही भारताच्या विशेष मुलाखतीत राज्यात भारनियमन नसल्याचा दावा त्यांनी ( No Load Shedding In Maharashtra ) केला. यावरच 'ईटीव्ही भारत'ने वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात शहरात भारनियमन नाही हे खरे असले ( Electricity problem in Nagpur city ) तरी, ग्रामीण भागात काही ठिकाणी अल्प प्रमाणात का होईना अघोषित स्वरूपाचे भारनियमन होत आहे. यात नागपूर आणि वर्धा मिळून 10 फिडर आहेत. ते जी1, जी2 आणि जी3 च्या वर्गवारीत मोडत असल्याने त्याच ठिकाणी ग्रामीण भागात भारनियमन होत ( Unannounced Load Shedding in rural Nagpur ) आहे.
ठराविक फिडरवर भारनियमन : नागपूर जिल्ह्यातील हा भाग एबीसी (ABC) वर्गात मोडतो. त्यामध्ये विजेची गळती आणि थकबाकी नसल्याने नागपूर शहरात विजेचे भारनियमन केले जात नाही. पण इतर तालुक्यातील काही ठराविक गावात काही फिडर असे आहेत की, त्याठिकाणी अल्प स्वरूपात काही मिनिटांसाठी भारनियमन केले जाते. दुरुस्तीची कामे असल्यास अश्या पद्धतीने वीज पुरवठा खंडित होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
ऑनलाईन एसएमसने दिली जाते लोडशेडिंगची माहिती :महावितरणकडे सुमारे 12 लाखापेक्षा अधिक ग्राहक हे ऑनलाईन एसएमएस सुविधेशी जोडले आहे. त्यामुळे शहरातील किंवा ग्रामीणमध्ये कुठल्याही भागात तांत्रिक बिघाड झाल्यास तशा पद्धतीने लोडशेडिंगची माहिती मोबाईल क्रमांकवर दिली जाते. त्यामुळे पूर्वसूचना दिल्याने लोकांना आपले काम वेळेत करून घेऊन त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. यात एसएमएसशी जोडलेले शहरात 8 लाखाच्यावर ग्राहक आहेत. तेच ग्रामीण भागातही सुमारे तीन लाख ग्राहक जोडले आहेत. पण जे ग्राहक जोडलेले नाहीत, त्यांना मात्र अचानक होणारे असो की नियोजित असो भारनियमनचा त्रास सहन करावा लागत आहे.