नागपूर -मध्यवर्ती कारागृहात Nagpur Central Jail तब्बल अडीच वर्षांनंतर आज अतिशय भावनिक क्षण अनुभवायला मिळाला आहे. कारागृह ध्वज दिनाच्या निमित्ताने नागपूर मध्यवर्ती कारागृह Emotional Movement At Nagpur Jail प्रशासनाने बंदीवान आणि त्यांच्या लहान चिमुकल्यांमध्ये गळा भेट Prisoner And Family Meet Program In Nagpur Central Jail घडवून आणली आहे. २०१८ नंतर हा पहिलाच प्रसंग आहे. बंदीवान त्यांच्या मुलाबाळांना भेटल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले. कारागृहाच्या चार भिंतीआड असलेल्या निरव शांततेला चिरत आज लहान मुलांच्या गोंगाटाने वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली. गुन्हेगारी जग किती वाईट असते याची जाणीव सुद्धा बंदीवानांना झाली असावी.
मुलाबाळांना भेटल्यानंतर बंदीवानांचे डोळे पाणावलेनागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात Nagpur Central Jail एकापेक्षा एक खुंखार बंदीवानांचा मुक्काम आहे. कळत-नकळत हातून घडलेल्या गुन्ह्याची ते शिक्षा भोगत आहेत. कोरोनानंतर कारागृहात Priबंदीवानांना भेटण्याची मनाई करण्यात आली होती. तब्बल अडीच वर्षांनंतर आज ध्वज दिनाच्या निमित्ताने कारागृह प्रशासनाने Nagpur Central Jail Administration शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना थेट त्यांच्या कुटुंबीयांना भेटता यावे यासाठी गळाभेट कार्यक्रमाची Prisoner And Family Meet Program In Nagpur Central Jail संकल्पना पुन्हा सुरू केली आहे. त्याअंतर्गत आज शेकडो बंदीवानांचा त्यांच्या लहान मुलांबाळांसह कुटुंबीयांना भेटता आले असून या भावनिक क्षणामुळे त्यांचे डोळे पाणावले होते.