महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गो एअरच्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग, प्रवासी सुखरूप

गो एअर(Go Air)च्या विमानाचे नागपूर विमानतळा(Nagpur Airport)वर इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. विमानात तांत्रिक अडचण आल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (emergency landing) करावे लागले. विमानातील सर्व प्रवासी, क्रु मेंबर्स आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती आहे.

Nagpur Airport
Nagpur Airport

By

Published : Nov 27, 2021, 12:43 PM IST

नागपूर - बंगळुरूवरून पटना येथे जात असलेल्या गो एअर(Go Air)च्या विमानाचे नागपूर विमानतळा(Nagpur Airport)वर इमर्जन्सी लँडिंग झाले आहे. विमानात तांत्रिक अडचण आल्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (emergency landing) करावे लागले. विमानातील सर्व प्रवासी, क्रु मेंबर्स आणि पायलट सुखरूप असल्याची माहिती आहे.

तांत्रिक समस्या

गो एअरच्या विमानाने (G 8873) आज सकाळी बंगळुरूवरून पटना येथे जाण्यासाठी उड्डाण झाले. मात्र विमानात तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची बाब लक्षात येताच पायलटने नागपूर विमानतळावरील ATSसोबत संपर्क साधून इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. विमानाची तांत्रिक समस्या लक्षता घेता पायलटला तत्काळ परवानगी देण्यात आली. इमर्जन्सी लँडिंगसाठी रन-वे रिकामा ठेवण्यात आला होता. लँडिंगदरम्यान अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता नागपूर विमानतळावर अग्निशामकचे बंब आणि रुग्णवाहिकादेखील तयार ठेवण्यात आली होती. विमानाच्या पायलटने आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून विमानाची इमर्जन्सी लँडिंग सुखरूप केले, ज्यामुळे विमानातील प्रवाशांबरोबरच सर्वांचा जीव भांड्यात पडला.

विमानात होते १३९ प्रवासी

विमानाने बंगळुरूवरून पटना येथे जाण्यासाठी उड्डाण भरले, तेव्हा विमानात ऑन बोर्ड १३९ प्रवासी आणि क्रु मेंबर्स होते. विमानाचे सुखरूप इमर्जन्सी लँडिंग झाल्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत. त्या सर्वांना दुसऱ्या विमानाने पटना येथे पाठवण्याची व्यवस्था केली जाते आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details