महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एप्रिलपासून वीज बिल दोन टक्क्यांनी कमी होणार, हे आमचं यश- बावनकुळे

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बिल ग्राहकांना दिलासा दिला आहे. एप्रिल महिन्यापासून बिल दोन टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आले आहे.

Former Energy Minister Chandrasekhar Bavankule
माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By

Published : Mar 5, 2021, 6:45 PM IST

नागपूर-महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बिल ग्राहकांना दिलासा दिला आहे. एप्रिल महिन्यापासून बिल दोन टक्‍क्‍यांनी कमी करण्यात आले आहे. हे या सरकारचे यश नसून 2000 मध्ये मंत्री असताना आम्ही या संदर्भात याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल आल्याचा दावा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच ग्राहकांना स्वस्त वीज मिळणार आहे. याचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये, असं देखील बावनकुळे म्हणाले.

माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जनतेला दोन टक्क्यांनी स्वस्त विज मिळणार-

एक एप्रिल पासून राज्यातील वीज ग्राहकांना दोन टक्यांनी स्वस्त वीज मिळणार आहे. ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध व्हावी यासाठी फडणवीस सरकारच्या काळात अवलंबिलेल्या धोरणांमुळे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने विजेचे दर दोन टक्क्यांनी कमी केले असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. फडणवीस सरकार सत्तेत असताना पाच वर्षाच्या कालावधीत ऊर्जा खात्याच्या धोरणात बदल करताना भारनियमनमुक्त महाराष्ट्र, पायाभूत सोयी सुविधा, विकासाचे धोरण ठरवून निर्णय घेण्यात आले होते. राजकीय हस्तक्षेप बाजूला ठेवत वीज दर कमी करण्यात आले होते. त्यामुळे आता राज्यातील जनतेला दोन टक्क्यांनी स्वस्त विज मिळणार असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत.

१०० युनिट वीज बिल माफ करण्याचे आश्वासन पूर्ण करावे-

लॉकडाऊनच्या काळातील 100 युनिट वीज बिल माफ करण्याची घोषणा उर्जा मंत्रालयाकडून करण्यात आली होती. मात्र अद्यापही या घोषणेची अंमलबजावणी झाली नाही. उलट ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केलेली घोषणा फिरवल्याने जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे राज्य सरकारने या घोषणेची अंमलबजावणी करण्याकरिता पुढच्या मंत्रालयाला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

हेही वाचा-रिषभ पंतच्या दमदार शतकामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारत सुस्थितीत

ABOUT THE AUTHOR

...view details