नागपूर -या शतकातील सर्वात मोठी बेईमानीची पत्रकार परिषद 24 ऑक्टोंबर 2019 रोजी पत्रकार परिषद झाली. ती पत्रकार परिषद भाजपच्या ( BJP ) पाठीत खंजीर खुपसणारी होती. भाजप शिवसेनेसोबत लढत असताना त्यांच्या मनामध्ये सत्तेचा मोह निर्माण झाला असा आरोप भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार ( BJP leader Sudhir Mungantiwar ) यांनी शिवसेनेवर केला. सध्या परिस्थिती बोलतांना ते म्हणाले त्याना दिवसा मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसू लागली. त्यामुळे काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ( Congress snd NCP ) जाण्याची भूमिका घेतली.
त्या दिवशी शिवसेना संपेल -हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी एकदा नाही तर अनेकदा सांगितलं होते की, ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल त्या दिवशी शिवसेना संपेल अशी आठवण मुनगंटीवार यांनी करून दिली. आता दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा असा इशारा संजय राऊत यांनी दिल्यानंतर कोणी कोणाच्या बापाच्या नावाने मत मागितले हे सगळ्यांना माहीत आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा नुवडणुकीत 2019 मध्ये कोणाच्या नावाने मत मागितले हे सर्वाना माहीत आहे. जनतेने कोणाला मते द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे.
नाचता येईना अंगण वाकडे -तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही. भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत. नाचता येईना अंगण वाकडे अशी परिस्थिती शिवसेनेची झालेली आहे. तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचा दोष भाजपला देण्याची गरज नाही. यात निश्चितपणे चुकीच्या दिशेने जात असल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणालेत. पण सरकार सत्तेतून जात असतांना आता यांना आता काश्मिरी पंडित आठवेल, स्वातंत्रवीर सावरकर आठवेल आता एक एक सगळं आठवेल असेही मुंनगंटीवर म्हणालेत.
फूस लावली म्हणणाऱ्याची बौध्दिकता तपासा -सगळे आमदार काही के जी वनला शिकवणारे विद्यार्थी नाही की त्यांना कोणी फूस लावली. की याचा आरोप हा दिल्लीत जात असलेलता देवेन्द्र फडणवीस याच्यावर केले जात आहे. हे सगळे आमदार निवडणून आलेले आहे. हे सर्व आमदार त्या सभागृहाचे सदस्य आहे. जिथे कायदे होते. त्यामुळे फूस लावली असे कोणी म्हणत असेल त्या वक्तव्य करणाऱ्यांची बौध्दिकता तपासलीच पाहिजे असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.