महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 21, 2021, 12:45 PM IST

ETV Bharat / city

भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहारप्रकरणी एकनाथ खडसेंना दिलासा, आठवडाभरा अटक न करण्याचे न्यायालयाचे आदेश

भोसरी एमआयडीसी जमीन गैर व्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खडसेंना आठवडाभरा अटक करु नका, असे आदेश दिले आहेत.

eknath khadse latest news
eknath khadse latest news

मुंबई - पुणे भोसरी एमआयडीसी जमीन गैर व्यवहारप्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खडसेंना आठवडाभरा अटक करु नका, असे आदेश दिले आहेत. या आठवडाभरात पीएमएलए कोर्टात खडसे रितसर जमीनासाठी अर्ज करू शकणार आहे.

काय आहे हे प्रकरण? -

भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता सध्या दिसत आहे. फडणवीस सरकारच्या कालावमध्ये महसूलमंत्री पदी असताना खडसेंनी पुण्यातील भोसरीमधील ३.१ एकर जमीनीचा एमआयडीसीमधील प्लॉट खरेदी करण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ साली करण्यात आला. या जमीनीची किंमत ३१ कोटी रुपये इतकी असून ती केवळ ३ कोटी ७० लाखांना विकण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पत्नी मंदाकिनी खडसे यांना हायकोर्टानं मोठा दिलासा दिला होता. दरम्यान, 17 ऑक्टोबर ते 7 डिसेंबरपर्यंत तपासयंत्रणेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देश देत याकाळात आठवड्यातून दोनदा, दर मंगळवारी आणि शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे मंदाकिनी खडसेंना निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यानच्या काळात मंदाकिनी खडसे यांना अटक झाल्यास त्यांची 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी दिले होते. भोसरी जमीन घोटाळ्यातील खटल्याला वारंवार गैरहजर राहिल्यानं पीएमएलए कोर्टाकडनं मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे, ज्याविरोधात त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. यावेळी तपास यंत्रणाना सहकार्य करण्याच्या अटीवरच मंदाकिनी खडसे यांना जामीन देण्यात आला होता.

एकनाथ खडसेंनी मागून घेतली वेळ -

याप्रकरणी मंदाकिनी खडसे यांचा याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत सोमवारी पीएमएलए कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केला. या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देता यावे यासाठी तीन आठवड्यांची स्थगिती खडसेंच्यावतीने मागण्यात आली. मात्र, कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली होती. एकनाथ खडसेंना मात्र याप्रकरणी कोर्टाने वैद्यकीय कारणास्तव तूर्तास दिलासा दिला आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकनाख खडसे हे सध्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले. यापूर्वी एकनाथ खडसे यांना ही बोलवण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कारण देत त्यांनी वेळ मागून घेतली आहे.

हेही वाचा -आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात 26 ऑक्टोबरला होणार सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details