नागपूर - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर ईडीने आता त्यांची पत्नी आरती देशमुख यांना सुद्धा समन्स बजावले आहे. या समन्समध्ये त्यांना चौकशीच्या अनुषंगाने काही कागदपत्रांसोबत गुरुवारी मुंबई येथील कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे. पण खुद्द माजी गृहमंत्री यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहण्या ऐवजी ऑनलाइन माध्यमातून चौकशी करावी, असे म्हटले आहे. यामळे त्यांच्या पत्नीच्या बाबतीत सुद्धा प्रत्यक्ष हजर न राहता ऑनलाईनने विचारपूस कारावी, अशीच मागणी केली जाईल अशी काहीशी शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख यांच्यावर मनी लॉंडरिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरू केली आहे. देशमुख यांना ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी कार्यलयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र देशमुख यांनी ऑनलाईन पद्धतीने चौकशी करावी. जे काही माहिती कागदपत्रे मागवली जाईल ती दिली जात आहेत, अशी माहिती ईडी कार्यालयास देण्यात येत असल्याचेही त्यांच्या वकिलांकडून सांगितले जात आहे. त्यानंतर ईडीने देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश आणि सून यांनाही समन्स बाजावले होते. यात ते सुद्धा प्रत्यक्ष चौकशीला हजर झाले नाही.
ईडीकडून देशमुख कुटुंबातील इतर सदस्यांना समन्स बजावल्यानंतर आता देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांनाही दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स बजावेल आहे. त्यांना गुरुवारी(15 जुलै) ईडी कार्यलयात सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यात मात्र त्या ज्येष्ठ नागरिक असून त्यांचा या प्रकरणाशी काहिही एक संबंध नाही. तसेच पाहिजे ते कागपत्र सादर केले जाईल, अशी शक्यता यात वर्तवली जात आहे. यामुळे गुरुवारी नेमके काय घडते आणि त्यानंतर ईडीकडून कुठले पाऊल उचलले जातील याकडे लक्ष लागले आहे. पण एकंदर या याप्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढ होताना दिसून येत आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची पत्नी आरती देशमुख यांना ईडीचे समन्स - ED summons Anil Deshmukhs
देशमुख यांना ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी कार्यलयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र देशमुख यांनी ऑनलाईन पद्धतीने चौकशी करावी. जे काही माहिती कागदपत्रे मागवली जाईल ती दिली जात आहेत, अशी माहिती ईडी कार्यालयास देण्यात येत असल्याचेही त्यांच्या वकिलांकडून सांगितले जात आहे. त्यानंतर ईडीने देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश आणि सून यांनाही समन्स बाजावले होते. यात ते सुद्धा प्रत्यक्ष चौकशीला हजर झाले नाही.
आरती देशमुख यांना ईडीचे समन्स,
अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ-
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केला होता. त्यानंतर ईडीच्या चौकशीत सचिन वाझे याने अनिल देशमुख यांना 4 कोटीपेक्षा अधिक रक्कम बारचालकांकडून वसूल करून देण्यात आल्याचे म्हटल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीत अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
Last Updated : Jul 15, 2021, 6:57 AM IST