महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरातील Travotel हॉटेलवर ईडीकडून छापे - अनिल देशमुख प्रकरण

ईडीने आज नागपुरातील Travotel हॉटेलवर छापा टाकल्याची माहिती मिळत आहे.

ed raids
Travotel hotel

By

Published : Aug 7, 2021, 8:35 PM IST

Updated : Aug 8, 2021, 9:16 AM IST

नागपूर - ईडीने आज नागपुरातील हॉटेलवर छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास ईडीने हा छापा टाकला.

हॉटेलबाहेरून प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

हेही वाचा -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर ईडीकडून छापेमारी

नागपूर-वर्धा मार्गावरहे हॉटेल आहे. या हॉटेलचे संचालक माजी गृहमंत्री अनिल देशमख यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. याबाबत हॉटेलचे मॅनेजर व अन्य व्यक्तींना विचारले असता, त्यांनी ईडीची कुठलीही चौकशी झाल्याच्या बातमीला नकार दिला आहे. शुक्रवारी नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत चौकशी केली होती.

हेही वाचा -लवकरच अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक होणार - किरीट सोमैया

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर छापे

मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील शैक्षणिक संस्थेवर शुक्रवारी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील फेट्री शिवारातील माहुरझरी परिसरात श्रीसाई शिक्षण संस्थेचे नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी कॅम्पसमध्ये ईडीचे अधिकारी पोहचले होते. ही तीच संस्था आहे, ज्याचे अध्यक्ष अनिल देशमुख, पत्नी आणि मुलगा ऋषिकेश यामध्ये संचालक पदावर आहेत. याशिवाय देशमुख यांच्या महाराष्ट्रातील इतरही ठिकाणी ईडी पथकामार्फत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

Last Updated : Aug 8, 2021, 9:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details