नागपूर- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीचा छापा पडला आहे. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्या ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. या ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू केली आहे.
देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ-
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने जोरदार धक्का दिला आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून नुकतीच जप्त करण्यात आली आहे. शंभर करोड रुपये वसुली प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या अगोदर अनिल देशमुख यांच्या दोन निकटवर्तीयांना देखील याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांच्या कोटोल येथील वडलोपार्जित घरावर ईडीकडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे.