महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'वादाचा' नागपूरकरांना ड्राय वॉशिंगद्वारे पाणीबचती 'वादा' - विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन

यंदा विदर्भात पाऊसच नसल्याने भीषण पाणी टंचाई आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी 'विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन' म्हणजे वादाकडून नागपूरमध्ये ड्राय वॉशिंगची संकल्पना राबवली जात आहे

'वादाचा' नागपूरकरांना ड्राय वॉशिंगद्वारे पाणीबचती 'वादा'

By

Published : Jul 23, 2019, 5:56 PM IST

नागपूर - विदर्भात पाऊसच झाला नसल्याने यंदा भीषण पाणी टंचाई आहे. या संकटावर तोडगा काढण्यासाठी 'विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन' म्हणजे वादाकडून नागपूरमध्ये ड्राय वॉशिंगची संकल्पना राबवली जात आहे.

'वादाचा' नागपूरकरांना ड्राय वॉशिंगद्वारे पाणीबचती 'वादा'

पाणी बचतीसाठी वाहनांची ड्राय वॉशिंग विदर्भ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनचा उपक्रम

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जल साठयांमध्ये पाणी नाही. त्यामुळे पाणी कपातीची नामुष्की शहरावर ओढवली आहे. अशा परिस्थितीत गाडी वॉशिंगसाठी पाण्याचा वापर न करण्याचा निर्णय 'वादा' ने केला आहे. शहरात ऑटोमोबाईल्सचे ५० वर्कशॉप्स आहेत. या वर्कशॉपमध्ये दिवसाला ६०० चारचाकी आणि तीन हजारांवर दुचाकींची धुलाई केली जाते. प्रत्येक गाडीच्या धुलाईला १५० ते १६० लिटर पाणी खर्च होत असते. सध्या संपूर्ण जून महिना पाण्याविना गेला आणि जुलैमध्ये सुद्धा पावसाचे चित्र दिसत नाही. ‘ड्राय वॉशिंग’मध्ये वाहनाच्या धुलाईस केवळ दोन ते तीन लिटर पाण्याचा वापर होतो. त्यामुळे बाऱ्याच पाण्याची बचत होते.

जुलैपासून विदर्भातील सर्व ऑटोमोबाईल डीलर्सना ग्राहकांच्या वाहनांची धुलाई पाण्याऐवजी ‘ड्राय वॉशिंग’ तंत्रज्ञानाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती वादाचे अध्यक्ष आशिष काळे यांनी दिलीय

ABOUT THE AUTHOR

...view details