महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात - नागपुरात कोरोनावल लसीकरण

कोरोना महामारीचे संकट अद्याप टळले नाही. मात्र, बाजारात उपलब्ध होणाऱ्या कोरोनाच्या प्रतिबंधात्मक लसीचे लसीकरण कऱण्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात ड्रायरन घेतला जात आहे. राज्यातही चार जिल्ह्यात ड्रायरन घेतला जात आहे. नागपुरात या कोरोनाच्या प्रतिंबधात्मक लसीच्या ड्रायरनला सुरुवात झाली आहे.

corona vaccine
लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात

By

Published : Jan 2, 2021, 10:35 AM IST

Updated : Jan 2, 2021, 10:49 AM IST

नागपूर- देशात आणि राज्यात कोरोना लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नागपुरातील तीन आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची ग्रहण ड्रायरन मोहीम राबवली जात आहे.लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही. मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी आजच्या ड्रायरन मध्ये करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून ही लसीकरणाच्या ड्रायरनची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेतून निघणारे निष्कर्ष पुढील महिन्यात यावेळी लसीकरणाची मोहीम व्यापक प्रमाणात राबवली जाणार आहे. त्यावेळी राहिलेल्या उणिवा दूर करण्यासाठी मदत मिळणार आहे, त्यादृष्टीनेच आजचा ड्रायरन केला जात आहे.

नागपुरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या ड्रायरनला सुरुवात
अशी राबवली जात आहे ड्रायरन मोहीम-

सुरुवातीला ज्या लाभार्थीला लस टोचली जाणार(आज प्रत्यक्षात लस टोचली जाणार नाही) आहे, त्याची नोंदणी केली जात आहे. त्यानंतर त्या लाभार्थीला ताप आणि अन्य कुठला आजार आहे का यासंदर्भात माहिती घेतली जाते. त्यानंतर त्या लाभार्थीला कोरोना लसीकरणाच्या ॲपवर नोंदणी करण्याकरिता पाठवले जाते. शासनाकडून आलेल्या यादी मध्ये त्या लाभार्थीचे नाव समाविष्ट आहे, यासंदर्भात खात्री केली जाते. त्यानंतर एका सिस्टीममधून एक ओटीपी लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवला जातो, त्याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच प्रत्यक्षात आरोग्य सेविकांना लस दिली जाते.

लस दिल्यानंतर पुढील अर्धा तास त्या लाभार्थीला एका खोलीत विश्रांती घेण्याकरिता थांबवले जाते, यादरम्यान लाभार्थीला कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन होतात का याची नोंद घेतली जाते. कुठलीही समस्या नसल्यास त्या लाभार्थीला घरी सोडण्यात येईल, या सदर्भातील तयारी आजच्या ड्रायरन मधून केली जात आहे.

Last Updated : Jan 2, 2021, 10:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details