नागपूर- शहराच्या बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री भरधाव कारने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३ विद्यार्थ्यांसह कार चालक गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवले, रश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल - मद्यधुंद
रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान रस्तावर तुरळक गर्दी होती. यादरम्यान लक्ष्मी नगरच्या ८ रस्ता चौकाकडून येणाऱ्या भरधाव कारने एका मागे एक दुचाकी उडवायला सुरुवात केली.
रात्री १२ ते १ वाजताच्या दरम्यान रस्तावर तुरळक गर्दी होती. यादरम्यान लक्ष्मी नगरच्या ८ रस्ता चौकाकडून येणाऱ्या भरधाव कारने एका मागे एक दुचाकी उडवायला सुरुवात केली. त्यानंतर, मद्यधुंद कारचालकाने कार दुभाजकावर आदळवली. या अपघातात ईशान कुरेशी, संतोष अग्रवाल आणि महादेवन हे ३ विद्यार्थी गंभीर जखमी झाले.तर, कारचालक के. रवींद्र राव (वय ५५) जखमी झाले आहेत.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना उपचारासाठी रवाना केले आणि आरोपी कार चालक के. रवींद्र राव यांच्याविरुद्ध रश ड्रायव्हिंगचा गुन्हा नोंदवला. के. रवींद्र राव एका महाविद्यालयात प्राचार्यपदी कार्यरत असून अपघाताच्या वेळी त्यांनी दारू प्यायली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.