नागपूर -इव्हेंटच्या नावाखाली तरुणींकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला यश ( Drug smuggling gang busted in nagpur ) मिळाले आहे. पोलिसांनी टोळीचा मुख्य सूत्रधार अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या दोघांना अटक केली आहे. हे दोघे नागपुरात काही तरुणींना केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली ओडिसाला नेऊन तिथून त्यांच्यामार्फत अमली पदार्थाची तस्करी करायचे.
मुलींचा वापर अंमली पदार्थ तस्करी शारीरिक शोषणासाठी वापर - काही दिवसांपूर्वी अभिषेक पांडे आणि दत्तू नावाच्या दोन गुन्हेगारा एकमेकांना फोनवरून धमकावण्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावरुन हे दोन्ही आरोपी तरुणींना ओडिशाला नेऊन त्यांच्यामार्फत अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचा खुलासा केला. आतापर्यंत एकूण सहा तरुणींना या टोळीने अशा पद्धतीने अमली पदार्थाच्या तस्करीसाठी तसेच त्यांचा शारीरिक शोषण करण्यासाठी वापरल्याचे उघड झाले आहे.