नागपूर- कुख्यात डॉन अरुण गवळीची बुधवारपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहातून फर्लोवर सुटका करण्यात आली. परिवाराला भेटण्यासाठी अरुण गवळीने फर्लोची मागणी केली होती. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली आहे.
कुख्यात डॉन अरुण गवळी फर्लोच्या रजेवर; 28 दिवस राहणार तुरुंगाबाहेर - नागपूर मध्यवर्ती कारागृह
शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांच्या खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेला कुख्यात डॉन अरुण गवळीला २८ दिवसाची रजा मंजूर करण्यात आली. बुधवारपासून गवळीची कारागृहातून सुटका करण्यात आली.
कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी संचित रजा द्यावी, अशी मागणी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे केली होती. मात्र कारागृह प्रशासनाने तो अर्ज फेटाळल्याने गवळीने न्यायालयात धाव घेत संचित रजेसाठी अर्ज दाखल केला होता.
30 एप्रिलपासून गवळीची संचित रजा मंजूर करण्यात आली आहे. मात्र फर्लोचे नियम आणि अटींची प्रक्रिया पूर्ण करायला अतिरिक्त कालावधी लागत असल्याने गवळी काल फर्लोच्या रजेवर गेला. यापूर्वीही गवळीला ‘पॅरोल’ किंवा ‘फर्लो’वर सोडण्यात आले आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जमसांडेकर यांच्या हत्येची शिक्षा सध्या अरुण गवळी भोगत आहे.