महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रवादीचे नाही तर काँग्रेसचेच मत फुटले; दूनेश्वर पेठेचे काँग्रेसला प्रतिउत्तर

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असले तरी नगर नागपूर शहरात मात्र दोन्ही पक्षातील मतभेद ( NCP LEADERS ALLEGATIONS CONGRESS ) चव्हाट्यावर आले आहेत. नागपुरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. निवडणूकीत आघाडी धर्म राष्ट्रवादी काँग्रेसने पाळला नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

By

Published : Dec 18, 2021, 9:48 AM IST

CONGRESS
दूनेश्वर पेठे

नागपूर - नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीचे ( Nagpur Legislative Council Election) निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागताच नागपुरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र ( Dispute between NCP and Congress in Nagpur ) बघायला मिळत आहे. निवडणूकीत आघाडी धर्म राष्ट्रवादी काँग्रेसने पाळला नसल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसला ( Ncp Leaders Allegations Congress ) उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकही मत फुटले नसून उलट काँग्रेसचेच 40 पेक्षा जास्त मतं फुटल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

दूनेश्वर पेठेचे काँग्रेसला प्रतिउत्तर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटलं होते, की नागपुरसह विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुकान बंद करेल. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील नानांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. नानांनी केलेल्या वक्तव्याचा वचपा करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा सूर काँग्रेस नेत्यांमध्ये उमटलेला आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांनी पलटवार करत काँग्रेसवरच गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा काँग्रेसच्या विचारधारेशी जुळलेला आहे. त्यामुळे एखाद्या नेत्याने बेताल वक्तव्य केले असेल तर त्याकडे आम्ही दूर्लक्ष केले असल्याचं म्हणत नाना पटोलेवर टीका केली आहे.राष्ट्रवादीने पाळला आघाडी धर्म -विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यापासून तर निवडणूक होईपर्यंत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने किंवा अन्य कोणत्याही नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कोणत्याही नेत्याला साधा संपर्क देखील साधला नाही. आमची अपेक्षा होती की त्यांनी संपर्क साधावा, उलट मतदानाच्या 12 तास आधी उमेदवार बदलला. तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीला सूचित करण्याची तसदी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली नाही. एवढं होऊन सुद्धा महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादी सर्व प्रतिनिधींनी काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला मतदान केले. काँग्रेसच्या नियोजन शुन्यामुळेच त्यांचे मत फुटल्याचे त्यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details