महाराष्ट्र

maharashtra

Dikshabhumi Nagpur: दीक्षाभूमी भारतातील बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान, जाणून घ्या सविस्तर माहिती

By

Published : Sep 27, 2022, 9:43 PM IST

मुंबईतील चैत्यभूमी (Chaityabhoomi in Mumbai) आणि नागपुरातील दीक्षाभूमी (Dikshabhumi Nagpur) हि दोन्ही स्थळे बौद्ध धर्मीयांसाठी (Buddhist) अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर (dr. babasaheb ambedkar) यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली महास्थविर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा (Initiation of Buddhism) प्राप्त केली होती. त्यानंतर बाबासाहेबांनी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. तेव्हापासून या पवित्र स्थानाचे दीक्षाभूमी असे नामकरण झाले.

Dikshabhumi Nagpur
दीक्षाभूमी भारतातील बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान

नागपूर:नागपूरातीलदीक्षाभूमी भारतातील बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान आहे.मुंबईतील चैत्यभूमी (Chaityabhoomi in Mumbai) आणि नागपुरातील दीक्षाभूमी (Dikshabhumi Nagpur) हि दोन्ही स्थळे बौद्ध धर्मीयांसाठी (Buddhist) अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची मानली जातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर(dr. babasaheb ambedkar) यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली महास्थविर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा (Initiation of Buddhism) प्राप्त केली होती. त्यानंतर बाबासाहेबांनी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. तेव्हापासून या पवित्र स्थानाचे दीक्षाभूमी असे नामकरण झाले. दीक्षाभूमीबद्दल जाणून घेऊयात सविस्तर

दीक्षाभूमी भारतातील बौध्द धर्मियांचे श्रध्दास्थान

दीक्षाभूमीचा इतिहास(History of Dikshabhumi)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी श्रेष्ठ अशा मानवतावादी बुद्ध धर्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956 रोजी घेतली. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतली होती. त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात आला होता. मात्र, ती जागा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झाली असल्याची भावना आंबेडकरी अनुयायांची असल्याने ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने जोर धरत होती. महाराष्ट्र शासनाने जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची 14 एकर जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर 1978 साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, संपूर्ण बांधकाम 2001 साली पूर्ण करण्यात आले.

दीक्षाभूमीवरील स्तूप वेगळादीक्षाभूमीवर मोठ्या स्तूपाची निर्मिती करण्यात आली आहे. दीक्षाभूमीवर स्तूप हे प्राचीन सोपान पेक्षा वेगळे आहे. प्राचीन काळात सम्राट अशोकांनी अनेक स्तूप बांधले होते. ते सर्व स्तूप भरीव स्वरूपातील होते. मात्र, दीक्षाभूमीवर असलेला स्तूप आतून पोकळ आहे. स्तूपाच्या खालच्या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थी कलश ठेवण्यात आला आहे तर बाजूला गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे. त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास दर्शवणारे चित्र प्रदर्शन आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details