नागपूर :धनगर समाजाला सोईसुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारस करून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण
( Reservation for Dhangar Community ) देण्याची शिफारस करावी, अशी मागणी धनगर समाजाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे ( MP Dr. Vikas Mahatme ) यांनी केली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे ( Social Justice Minister Dhananjay Munde ) यांनीधनगर आरक्षणासाठी केंद्र सरकारला शिफारस करणारआहे. त्यानंतर कोण आरक्षणविरोधी आहे हे लवकर समोर येईल, असे विधान केले होते. या विधानाला प्रत्युत्तर देताना डाॅक्टर बोलत होते.
शिफारस करताना स्पष्टता असावी : यावेळी बोलताना धनगर समाजाचे नेते तथा राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी त्यांना तीन वर्षांत फडणवीस सरकारने लागू केलेल्या शासन निर्णयाचे काय झाले? असा सवाल उपस्थित केला. सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांनी धनगरांच्या आरक्षणासाठी नक्कीच शिफारस करावी. पण, 1979 मध्ये शिफारस करण्यात आली. पण, त्यानंतर ती 1981 मध्ये मागे घेण्यात आली. त्यामुळे तसे पुन्हा होऊ नये, असा टोला लगावला. तसेच शिफारस करताना एसटी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे, असेही शिफारस करताना स्पष्ट करा, असेही महात्मे म्हणालेत. ती शिफारस "नरो वा कुंजरो वा"सारखी भ्रमित करणारी नसावी, असेही धनगर समाजाचे नेते तथा माजी खासदार विकास महात्मे म्हणालेत.