नागपूर/वर्धा- वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेली धाम नदी गेल्या वर्षी मृतावस्थेत पोहचली होती. दिलासादायक बाब म्हणजे सामूहिक प्रयत्न आणि सामाजिक जाणिवेतून या धाम नदीला पुनर्जीवन प्राप्त झाले आहे. एक छोटासा प्रयत्न किती सकारात्मक बदल घडवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धाम नदी प्रकल्प आहे.
आर्वी तालुक्यातील शेकडो गावांची आणि संपूर्ण वर्धा शहराची तहान भागावणारी धाम नदीला जलवाहिनीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बजाज फाऊंडेशनच्या मदतीने प्राथमिक टप्यात केवळ चार कोटी रुपये खर्च करून सुमारे सहा किलोमीटर नदीतील गाळ काढून खोलीकरण आणि सोंदर्यीकरण करण्यात आले आहे. येत्या दोन ते तीन वर्षात २६ किलोमीटर नदीच्या पात्राचे खोलीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील २६ किलोमीटरपैकी सहा किलोमीटरच्या पट्ट्यात काम पूर्ण झाले आहे. शेकडो टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे भूजल साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे.
हेही वाचा-स्वाभिमानीची ऊस परिषद : राजू शेट्टी नेमकी काय मागणी करणार याकडे सर्वांचे लक्ष..
वर्धा शहरापासून १५ किलोमीटर असलेल्या येळाकेळी या गावातून कधीकाळी तुडुंब भरून वाहणारी धाम नदी शेवटच्या घटका मोजत होती. धाम नदीला कधीकाळी वर्धा जिल्ह्याचे वैभव म्हणून ओळख मिळाली होती. मात्र हळूहळू नदीत मातीचा भराव पडल्याने नदीचे पात्र संकुचित होत गेले. नदीतील गाळ कधीही काढलाच गेला नसल्याने धाम नदी मृत पावली होती.
उद्योगपती राहुल बजाज यांनी घेतला पुढाकार-