नागपूर - रस्त्यावर वाहन चालवताना झोपेच्या डुलकी लागून होणाऱ्या अपघातापासून रोखण्यासाठी नागपुरातील एक युवकाने खास डिव्हाईस तयार केले आहे. (Device Will Alert While Driving) या डिव्हाइस ड्रायव्हरसह प्रवाशांनाही सतर्क करतो. गौरव सव्वालाखे या हा डिव्हाइस बनवला आहे. दरम्यान, गौरवने याबाबतचा अनुभव ईटीव्ही भारतवर सांगितला आहे. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी बातचीत केली आहे.
अपघातानंतर ही कल्पना सुचली
हे सेन्सर, ३.६ व्होल्ट बॅटरीसह येते. या डिव्हाइसमध्ये ऑन-ऑफ स्विच आहे. जेव्हा ड्रायव्हरचे डोके स्टीयरिंग व्हीलच्या दिशेने ३० अंश झुकलेले असते, तेव्हा अलार्म डिव्हाइस कंपन करू लागेल आणि तुम्हाला सतर्क करेल. ( Fall Asleep While Driving ) जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले डोके ३० अंशाच्या कोनात झुकते आणि डिव्हाइस सक्रिय होते. गौरवने सांगितले की, एकदा झोपेमुळे कारला अपघात झाला होता. त्यात गंभीर जखमी झालो होतो. त्यानंतर गाडी चालवताना झोप लागल्यावर अलर्ट करण्यासाठी एक उपकरण डिझाइन करण्याची कल्पना सुचली.
जे झोपेच्या वेळी वाहनाचा समतोल राखेल
लक्झरी कारमध्ये सुरक्षिततेसाठी अनेक हायटेक उपकरणे आहेत. वाहनाभोवती बसवलेल्या सेन्सर्सवरून आजूबाजूच्या गोष्टींची कल्पना घेऊन कारचा वेग मर्यादित करते. परंतु सामान्य गाड्यांमध्ये असे कोणतेही उपकरण नाही. जे झोपेच्या वेळी वाहनाचा समतोल राखेल आणि अपघात होत असताना वाहनाचा वेग कमी करेल. मात्र, गौरव सावलाखे यांचे हे उपकरण सर्वसामान्य वाहनांना अपघातांपासून वाचवू शकते. गौरवच्या म्हणण्यानुसार, गाडी चालवताना हे उपकरण कानाच्या मागे ठेवावे लागते.
यापासून नक्कीच झोपेमुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होऊ शकेल
गौरव सव्वालाखे हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी असून नव नवीन कल्पनेतुन असे डिव्हाइस बनवण्याचा त्याचा छंद आहे. दुरच्या प्रवासात जाताना लागणाऱ्या डुलकीवरुन त्याला ही कल्पाना सुचली असे त्याने सांगितले. त्याने कानावर हेडफोन सारखे असणारे डिव्हाईस तयार केले. या डिव्हाइसमुळे जर का वाहन चालकाचे मान वाकून डोके स्टेरिंगच्या दिशेने 30 डिग्री पेक्षा अधिक झुकले तर त्या डिव्हाईसमधील बीप वाजायला सुरवात होते. त्यामुळे लगेच अलर्ट मिळतो. त्यामुळे यापासून नक्कीच झोपेमुळे होणारे अपघात टाळण्यास मदत होऊ शकते.