नागपूर - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे भाजपचा पोपट आहेत असा आरोप करण्यात येतं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे पोपटं बोलतायेतना अस उत्तर दिले आहे. ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या बोलण्यावर रिॲक्शन देण्याचे काही काम नाही
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते हे रोज समीर वानखडे आणि आर्यन प्रकरणाला धरून भाजपवर टीका करत आहेत. समीर वानखेडे हे भाजपचे पोपट आहेत अशी टीका केली जात आहे. तसेच जर समीर वानखेडे यांना अटक झाली तर भाजप अडचणीत येईल असाही आरोप होत आहे. त्यावर बोलताना देवेंद्र फडणीस म्हणाले, हे रोज काहीतरी बोलत असतात. त्यांना दुसरे काम नाही नाही, पण त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांच्या बोलण्यावर रिॲक्शन देण्याचे काही काम नाही असही फडणवीस म्हणाले आहेत.
समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याच दरम्यान त्यांनी अनेक गौप्यस्फोटही केले. काल आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर आज त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. त्यावेळी बोलताना त्यांनी समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्र, काशीब खान आणि एनसीबीला दिलेले पत्र, यासह विविध मुद्यांवर प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी खरी लढाई आता विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात होणार असून त्यावेळी पुन्हा गौप्यस्फोट करेल, त्यावेळी भाजपा नेते रस्त्यावर फिरु शकणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला.
हेही वाचा -होय मी भंगारवाला! शहरातील 'या' भंगाराला भट्टीत टाकल्याशिवाय शांत बसणार नाही - नवाब मलिक