महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भय नको, पण आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको! - देवेंद्र फडणवीस अपडेट

चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोना विरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, तसेच मुंबईच्या तुलनेत उपराजधानी नागपुरात अधिक चाचण्या होत असल्याचेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

फडणवीस
फडणवीस

By

Published : Apr 27, 2021, 7:25 PM IST

नागपूर - कोरोनाचे भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा काळात परवडणार नसल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनां एक पत्रात लिहून सुचवले आहे. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोना विरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, तसेच मुंबईच्या तुलनेत उपराजधानी नागपुरात अधिक चाचण्या होत असल्याचेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

गेल्यावर्षीही कमी चाचण्या
गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुद्धा कमी चाचण्या केल्या जात असल्याबद्दल संपूर्ण आकडेवारीसह सातत्याने पत्रव्यवहार करत नजरेस आणून दिले होते. दुसर्‍या लाटेची तीव्रता अधिक असताना पुन्हा एकदा काही बाबी आपल्या निदर्शनास आणून हे कर्तव्य समजून आपणास कळवतो असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नागपूर जिल्ह्यात 40 लाख लोकसंख्येत या कालावधीतील ही सरासरी 26,792 चाचण्या प्रतिदिन होत आहे. 68 लाखांच्या पुण्यात 22 हजार चाचण्या होत आहे. या शहरांच्या तीन ते चारपट लोकसंख्या असलेल्या मुंबईत केवळ 40 हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही. त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन जाईल असेही आकडेवारी निशी पत्रात म्हटले आहे.

अँटीजेन चाचण्यांची संख्या जास्त
आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर राज्यात जवळजवळ 40 टक्के चाचण्या अँटीजेन पद्धतीने होत आहेत. 26 एप्रिल रोजी नोंदलेल्या मुंबईतील 28 हजार चाचण्यांमधील 40 टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ 16,800 आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील, तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. मुंबईचा संसर्ग दर हा सातत्याने 14 ते 18 टक्के असताना आणि राज्याचा संसर्ग दर 25 ते 27 टक्क्यांच्या आसपास राहत असताना एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजीबात परवडणारे नाही.

रविवारी 25 एप्रिल 2021 रोजी राज्यात एकूण 2,88,281 चाचण्या नोंदविण्यात आल्या आहेत. त्यातील 1,70,245 आरटी-पीसीआर चाचण्या होत्या (59 टक्के), तर 1,18,036 चाचण्या या रॅपिड अँटीजेन (41 टक्के). तसेच सोमवारी 26 एप्रिल रोजीचे सुद्धा चित्र असेच आहे. त्यादिवशी 37 टक्के अँटीजेन चाचण्या आहेत. आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण 70 टक्क्यांच्या वर हवे, असे केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सांगितले जात असताना सुद्धा त्याचे पालन होताना दिसत नाही. मुंबईच्या बाबतीत अतिशय सजगतेने काम करण्याची गरज आहे. कारण, मुंबईतून संक्रमित लोक हे गावी गेले आहेत. गेल्या लाटेत त्यांचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग जसे झाले होते, तसे आता होताना दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढते आहे.

मृत्यूसंख्या सुद्धा सातत्याने दडविण्याचे काम होते आहे. रिकन्सिलिएशनचे काम अजून पूर्णत्त्वास गेलेले नाही. त्यामुळे जुनी मृत्यूसंख्या नंतर टप्प्याटप्प्याने अधिक करून नेमके चित्र उभे राहणार नाही. मुंबईच्या घाटांवर रोज अंत्यसंस्कार होणारे मृतदेह आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ नाही. हीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांत सुद्धा आहे. गेल्या काही दिवसांत जुने मृत्यू नोंदविण्याच्या प्रक्रियेमुळे राज्यात अवघ्या 7 दिवसांत 4460 मृत्यू नोंदण्यात आले आहेत. राज्यातील एकूण कोरोनाबळींच्या संख्येत एकट्या मुंबईत 20 टक्के मृत्यू आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही. त्यामुळे मुंबईत तर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्याच लागतील, शिवाय राज्याच्या अन्य भागात सुद्धा ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हे तत्त्व काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. त्यातही केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे आरटीपीसीआर चाचण्यांचा पुरेसा समतोल राखण्यात यावा, असे देवेेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details