महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amruta Fadnavis Criticized MVA : 'मै खाऊंगा भी, और खानेवाले की सुरक्षा भी करुंगा' असे राजकारण महाराष्ट्रात सुरू : अमृता फडणवीस - अमृता फडणवीसांची संजय राऊत यांच्यावर टीका

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ( EX CM Devendra Fadnavis ) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला ( Amruta Fadnavis Criticized MVA ) आहे. महाराष्ट्रात सध्या 'मै खाऊंगा भी, और खानेवाले की सुरक्षा भी करुंगा' असे राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली आहे.

अमृता फडणवीस
अमृता फडणवीस

By

Published : Mar 24, 2022, 8:47 PM IST

नागपूर - 'मै खाऊंगा भी, खिलाउंगा भी और खाने वाले को सुरक्षा भी दूंगा', असेच काहीसे राजकारण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. हे बंद झाले पाहिजे, महाराष्ट्राच्या नागरिकांना महाराष्ट्राचा विकासाचे राजकारण हवे आहे. भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे, असे अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis Criticized MVA ) म्हणल्यात. त्या नागपूरात एका पुस्तक प्रकानाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

'मै खाऊंगा भी, और खानेवाले की सुरक्षा भी करुंगा' असे राजकारण सुरू : अमृता फडणवीस

राज्यातील भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे : शिवसेना खासदार संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आले असता अमृता फडणवीस यांनी त्यांना नागपुरातील प्रसिद्ध असे सावजी मटण खाण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राऊत यांनी 'मी यापूर्वी सावजी खाल्ले आहे, सल्ला दिल्याबद्दल वहिनींचे धन्यवाद', अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर अमृता फडणवीस यांनी राऊत यांना उत्तर दिले ( Amruta Fadnavis Criticized Sanjay Raut ) आहे. 'मै खाऊंगा भी, और खानेवाले की सुरक्षा भी करुंगा' असे राजकारण सुरू आहे. कुणी काहीही खा, पण राज्यातील भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे असं त्या म्हणाल्या.

पुरावे असल्याशिवाय केंद्रीय यंत्रणा कारवाई करत नाहीत : केंद्रीय तपास यंत्रणा जेव्हा तपास करता तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असतात. तेव्हा ते तपास करतात आणि निपक्षपद्धतीने तपास करतात. त्यामुळे आता आपण त्यावर बोलून काही उपयोग नाही. सर्व चौकशीच्या अंतिम निष्कर्ष समोर आल्यावरच कळेलच. केंद्रीय तपास यंत्रणा कुठेही सूड भावनेने कारवाई करत नाही. त्यांच्याकडे पुरावे असतात, काही सुगावे असतात, तेव्हा कारवाई करतात, असेही त्या म्हणाल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details