नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 1857 च्या उठावात सामील होते, असा टोला मंत्री आदित्य ठाकरेंनी लगावला होता. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सडीज बेबीला संघर्ष करावा लागला नाही, त्यांनी कधी संघर्ष पहिला नाही. पण, त्यांनी जी कारसेवकाची थट्टा उडवली, त्यामुळे आम्हाला फरक पडत नाही. ते उडवू शकतात. त्यांनी कितीही थट्टा उडवली, तरी त्यावेळी आम्ही बाबरी मस्जिद पाडण्याच्या तिथे होतो. मी हिंदू आहे, त्यामुळे हिंदू धर्मानुसार मी जन्म आणि पुनर्जन्म दोन्ही मानतो. तुम्ही अश्या लोकांशी युती केली ते 1857 युद्धाला स्वतंत्र युद्ध मानत नाही, त्यामुळे त्यांना काय बोलायाचे आहे ते बोलू द्या, असा टोला देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंना लगावला ( Devendra Fadnavis Taunt Aaditya Thackeray ) आहे.
ते नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हनुमान चालीसा म्हणण्यासाठी राजद्रोहाचा गुन्हा लावण्याचा करंटेपणा राज्य सरकारने केला. त्यामुळे कधीही, असे प्रकरण न्यायालयात टिकू शकत नाही. राणा दाम्पत्यला जामीन मिळणार ( Devendra Fadnavis On Rana Couple ) होताच.
मनसेच्या आंदोलनाबाबत बोलताना फडणवीसांनी सांगितले की, राज्य सरकार राणा दाम्पत्यावर चालीसा म्हणल्यामुळे राजद्रोह लावते. तर, भोंग्या स्वरूपात त्यांची भूमिका सर्वांना माहीत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती काही कोण्या एका पक्षाची नाही. सरकार जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल, तर राजकीय पक्षांना आपली भूमिका मांडावी ( Devendra Fadnavis On Loudspeaker Controversy ) लागेल.