नागपूर - ड्रग ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे एखादी एजन्सी कीड काढण्याचे काम करते, तेव्हा त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. कारण हा काही एका पक्षाचा प्रश्न नाही. त्यात राजकारण करणे चुकीचे असल्याचे म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला. ते नागपूरात विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईत भाजपच्या नातेवाईकाला सोडण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याच्या मुलाचा जवळच्या व्यक्तीलाही सोडण्यात आले. पण तो क्लीन असल्याने त्याचे नाव घेणार नाही. त्याला बदनाम करणे अयोग्य आहे. एनसीबीने क्लिअर केले आहे. जे क्लीन होते त्यांना सोडण्यात आले. त्यामुळे कुणा पक्षाचा काहीही संबंध नाही. तसेच नवाब मलिक यांचे दुखणे वेगळे आहे. त्यावर बोललो आहे. आता बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक बोलणेही टाळले.
ड्रग ही समाजाला लागलेली कीड, त्यात राजकारण करणे चुकीचे हेही वाचा-होय... गोसावी-भानुशालीच्या माहितीच्या आधावरच क्रूझवर केली कारवाई, एनसीबीचा खुलासा
1050 कोटींच्या दलालीचे पुरावे सापडून राजकारण म्हणणे चुकीचे.....
प्राप्तिकर विभागाने धाड टाकून कारवाई करत 1,050 कोटीच्या दलालीचा प्रकार उघडकीस आणला आहे. अतिशय गंभीर प्रकार असून त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. पण 1,050 कोटीच्या संदर्भात पुरावे सापडले असताना राजकारण म्हणणे चुकीचे आहे. हा पुरावा राज्यातील नाही तर देशातील दलालीच्या प्रकरणाचा मोठा पुरावा आहे. त्या पुराव्यामध्ये बदली, टेंडर, मंत्री आणि अधिकारी समावेश आहे. पहिल्यांदाच असे काही उघडकीस आले आहे. त्यात अधिकच खुलासा त्या एजन्सी करतील. त्यावर अधिक बोलणे योग्य नाही.
हेही वाचा-केलेली कारवाई कायदेशीरच, नवाब मलिक यांच्या आरोपानंतर 'एनसीबी'चा खुलासा
प्राप्तिकर विभागाची पवार कुटुंबियांवर कारवाई नाही...
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून मागील तीन दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ही कारवाई काही पवार कुटुंबीयांवर होत नाही. तर त्या पाच कारखान्यात खरेदी-विक्री करण्यात आलेल्या व्यवहाराशी संबंधित असलेल्या कारखान्याच्या संचालकांवर ही कारवाई केली आहे. पवार कुटुंबीयांचे इतरही क्षेत्रात व्यवसाय असून त्यांच्यावर कारवाई झाली. त्या पाच कारखान्याच्या संदर्भात चुकीच्या पैशाने व्यवहार झाल्याने प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. यात विक्रीसाठी दिलेला पैसा हा काळा पैसा, किंवा लाचेचा असलेला काळा पैसा टॅक्स भरून पांढरा करू शकत नाही. त्यामुळे कारखाना खरेदी करताना योग्य पैशाने व्यवहार करावा लागतो. त्यामुळे ही झालेली कारवाई पवार कुटुंबियांवर होत आहे, असे म्हणणे अयोग्य असल्याचेही विरोधी पक्षनेते फडणीस म्हणाले.
हेही वाचा-शाहरुख खानच्या वाहन चालकाला 'एनसीबी'चे समन्स, चालक चौकशीसाठी कार्यालयात हजर