नागपूर : काल राज्यातील अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले ( Maharashtra IPS Officers Transferred ) होते. मात्र हा आदेश जारी होण्याच्या अवघ्या बारा तासात काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या ( Maharashtra IPS Transfer Promotion Cancelled ) आहेत. बदल्यांचे आदेश परत घेण्यामागे नेमकं काय कारण आहे? ही प्रशासकीय चूक आहे का, याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली ( Devendra Fadnavis IPS Transfer Promotion Cancelled )आहे.
तो वसुलीचा भाग असल्याचं समोर आलं : याआधी सुद्धा राज्यातील दहा आयपीएस (डीसीपी) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यानंतर त्या बदल्यात रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळी झालेल्या बदली घोटाळ्याची चौकशी सुरू ( Police Transfer Fraud Case ) असून, त्याला आर्थिक घोटाळ्याची किनार लागली आहे. तो वसुलीचा भाग असल्याचं देखील तपासात समोर आलं होतं. त्यामुळे हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असल्याने या मागील नेमकं कारण काय आहे? याचा खुलासा झाला पाहिजे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
संजय राऊतांना सद्बुद्धी येईल : गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा शिवसेना खासदार संजय राऊत हे नागपूरच्या दौऱ्यावर येत ( Sanjay Raut Nagpur Visit ) आहेत. संजय राऊत यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मात देण्यासाठी नागपुरवर लक्ष केंद्रित केले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, नागपूरच्या मातीत आणि वातावरणात वेगळेपण आहे. संजय राऊत यांनी वारंवार नागपूरचा दौरा केल्यास त्यांना सद्बुद्धी ( Devendra Fadnavis Criticized Sanjay Raut ) येईल. देवेंद्र फडणवीस आज नागपूर विमानतळावर बोलत होते.