महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis on Nawab Malik Arrest : नवाब मलिक यांनी दहशतवाद्याकडून जमीन खरेदी करण्याचे कारण काय - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस नवाब मलिक अटक प्रतिक्रिया

अंडरवर्ल्ड सोबत संबंध आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या गंभीर आरोपाखाली राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) अटक ( Nawab Malik Arrest By ED in Mumbai ) केली आहे. त्यांना पीएमपीएल कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की नवाब मलिक यांच्या संदर्भातील हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएय आणि ईडीने काही ॲापरेशन ( ED search on Nawab Malik ) केले. त्यात दाऊद रिअल इस्टेटमधून टेरर फंडिंग (T error funding to Dawood by Minister ) करत असल्याचे दिसून आले आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Feb 23, 2022, 10:53 PM IST

Updated : Feb 23, 2022, 11:00 PM IST

नागपूर -दाऊदची बहीण हसीना पारकर येऊन सौदा करत होती. हसीनाला या व्यवहारात ५५ लाख मिळाले होते. अंडरवल्डच्या मदतीने नवाब मलिक यांना जमीन मिळाली होती. सर्व पैसा हसीना पारकर म्हणजेच दाऊदला मिळाला असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंतची ईडी कोठडीत पाठवले आहे. दिवसभरातील घडामोडींवर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली ( Devendra Fadnavis on Nawab Malik Arrest ) आहे.

अंडरवर्ल्डसोबत संबंध आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याच्या गंभीर आरोपाखाली राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना प्रवर्तन संचालनालयाने (ईडी) अटक ( Nawab Malik Arrest By ED in Mumbai ) केली आहे. त्यांना पीएमपीएल कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की नवाब मलिक यांच्या संदर्भातील हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. एनआयएय आणि ईडीने काही ॲापरेशन ( ED search on Nawab Malik ) केले. त्यात दाऊद रिअल इस्टेटमधून टेरर फंडिंग ( Terror funding to Dawood by Minister ) करत असल्याचे दिसून आले आहे. ईडीनेसुद्धा नऊ ठिकाणी सर्च धाडी टाकल्या होत्या. त्यात अनेक लिंक मिळाल्या आहेत. त्यात लिंकमध्ये मंत्री नवाब मलीक यांचे नाव असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी ज्या जमीनीचा व्यवहार केला आहे. त्या मूळ जमीन मालकांना कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यांच्यावर दबाव होता. त्यांना एकाही पैसा मिळाला नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

मुंबईत बॅाम्बस्फोट करणाऱ्यांसोबत जमीन खरेदीचा व्यवहार का केला?


हेही वाचा-नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही - मंत्री छगन भुजबळ

मंत्र्यांनी दहशतवाद्याकडून जमिन खरेदी करण्याचे कारण काय -
मुंबईत बॅाम्बस्फोट करणाऱ्यांसोबत जमीन खरेदीचा व्यवहार का केला? एखाद्या मंत्र्यांनी दहशतवाद्याकडून जमीन खरेदी करण्याचे कारण काय? असा प्रश्न विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ईडीने आज केलेली कारवाई नियमानुसार आहे. संपूर्ण व्यवहारात टेरर फन्डिंगची बाब स्पष्ट दिसत आहे. दाऊद जो देशाचा शत्रू आहे किंवा त्याच्या बहीणशी व्यवहार कसे करू शकतो, असे फडणवीसांनी विचारले आहे.

हेही वाचा-Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कनेक्शन? 'या' प्रकरणात झाली अटक

या विषयावर राजकारण नको
कुठल्याही राजकीय पक्षाने टेरर फंडिंगचा निषेध करायलाच पाहिजे. देशाचा शत्रू असलेल्या दाऊद विरोधात भुमिका घ्यायला हवी. हजारो कोटी रुपयांची जमीन ३० लाखात घेतली. त्याचे पैसे मुळ मालकाला मिळाले नाही. या व्यवहारातनंतर मुंबईवर तीन वेळा दहशतवादी हल्ले झाले. या व्यवहारातील पैसा हसीना पारकरच्या माध्यमातून दाऊदला गेला. अशाच दहशतवादी कृत्यात हा पैसा वापरला गेला. त्यामुळे देशाच्या शत्रूसोबत व्यवहार करण्याचे कारण काय?. हा राजकारण करण्याचा विषय नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी देशहिताची भूमिका घ्यावी असे, फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा-Nawab Malik Arrested : ७ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना ईडीकडून अटक.. न्यायालयाकडून ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी..

हा तर चुकीचा पायंडा
सध्या अतिशय चुकीचा पायंडा पाडला जातो आहे. मलिकांना राजकीय गुन्ह्यांत अटक नाही. टेरर फंडिंगमध्ये अटक झाली आहे त्यात एक मंत्री राजीनामा देणार नसेल तर संविधानीक स्थिती निर्माण होईल. राजकारणाचा स्तर इतका खाली पडला. तर एक वाईट पायंडा पडेल. दाऊदशी संबंधीत व्यवहार केलेल्याचा मंत्र्याला वाचवायला सर्व पक्षांनी एकत्र येणे धोक्याचे असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे मत आहे की आम्हाला राजीनामा मागण्याची वेळ यायला नको. यांनीच राजीनामा द्यायला हवा.

संजय राऊत यांच्यावर मी बोलणार नाही-
संजय राऊत जसे बोलतात यांना उत्तर देणे माझ्या स्तरात बसत नाही नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्र सरकार खोटे साक्षीदार उभे करत आहे. याबाबत खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले आहेत. सरकारी यंत्रणा खोटेपणा करुन लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे.


Last Updated : Feb 23, 2022, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details