नागपूर : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता बदल झाल्यानंंतर ( After the change of power ) भाजप पुरस्कृत शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार सांभाळला आहे. नवीन सरकारच्या कामकाजाला सुरुवातसुद्धा झाली. नवीन सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अजून बाकी आहे. तरी काल देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) हे कामानिमित्त नागपूरला आले ( Devendra Fadnavis come to Nagpur ) होते. त्यांनी नागपूर विमानतळावर आल्यानंतर प्रथमच भाजपचे मातृस्थान ( Sangh Headquarters, Motherland of BJP )असलेल्या संघ मुख्यालयास ( Sarsangchalak Mohan Bhagwat ) भेट दिली.
संघ मुख्यालयास भेट : देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरला आले. यावेळी विमानतळावर आल्यानंतर थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. संघ मुख्यालयात ते बरोबर 9 वाजता आले होते. तब्बल 45 मिनिटे त्यांनी सरसंघचाल यांची भेट घेतली. यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते नागपुरात येऊ न शकल्याने आज त्यांनी सरसंघचालक यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तसेच, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच संघ कार्यालयात भेट घेत अनेक विषयांवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे. यात नेमकी चर्चा काय झाली असावी, यावर मात्र तर्कवितर्क व्यक्त लावला जात आहे.
संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते : देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. त्यांनी स्वतः याचा अनेक वेळा उल्लेख केला आहे. त्यांनी याबद्दल अनेक ठिकाणी गौरवोद्गार काढले आहेत. संघाच्या शिस्तीने मी येथपर्यंत आलो आहे. असे ते नेहमी म्हणत असतात. संघ कार्यकर्ता ते संघ प्रचारक असा त्यांचा संघातील प्रवास राहिला आहे. संघा कार्यकर्ता म्हणून त्यांनी बरेच वर्षे काम केल्यामुळे त्यांना कार्यकर्ता म्हणून कामाचा चांगाला अनुभव आहे. मागील बरेच दिवस देवेंद्र फडणवीस संघ मुख्यालयाला भेट दिली नव्हती. गुरुपौर्णिमेला त्यांना येत आले नसेल, त्यामुळे कदाचित त्यांनी काल नागपुरात आल्यावर विमानतळावर आल्यानंतर थेट संघ मुख्यालय गाठले.