नागपूर -अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणांना ( Mla Ravi Rana ) खार पोलिसांनी ( Khar Police ) अटक केली आहे. त्यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी कलम 153 (अ) अंतर्गत कारवाई करत, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणा दाम्पत्याची आजची रात्र पोलीस ठाण्यातच जाणार आहे. त्या अटकेवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर प्रश्नांची सरबत्ती करत निशाणा साधला ( Devendra Fadnavis Criticizes Thackeray Government ) आहे.
ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना व्यथित करणाऱ्या असून, भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले होत असताना आरोपी अटकेत नाही. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला असताना गुन्हा दाखल होत नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा होत असताना त्याची साधी दखल सुद्धा नाही. हनुमान चालीसा पठनाला राणा दाम्पत्य येतात त्यांना थेट अटक केली जाते, असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहे.