नागपूर - शाहू महाराज आमचे छत्रपती ( Devendra Fadnavis on Shahu Maharaj ) आहे, त्या गादीचा एक मान आहे, त्यामुळे त्यांनी कुठलेही मत व्यक्त केले असले तरी त्यासंदर्भात ( shahu maharaj kolhapur ) मी बोलणार नाही, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis on sambhaji maharaj tweet ) माध्यमांशी बोलताना म्हणाले. ते नागपुरात भाजपच्या वतीने आयोजित मन की बात कार्यक्रमानंतर ( Devendra Fadnavis news nagpur ) बोलत होते.
प्रतिक्रिया देताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेही वाचा -जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन : नसरीनची 'नई दिशा' किशोरवयीन मुलींसाठी वरदान
श्रीमंत शाहू महाराज यांनी काल संभाजी राजे यांचे कान टोचले. त्या संदर्भात स्वतः छत्रपती संभाजीराजे ( Rajya sabha election ) यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. त्यात संभाजीराजे म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो की, मी जे बोललो ते सत्य बोललो. यावर, मला असे वाटते की, त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे, असे फडणवीस म्हणालेत.
यात एकच गोष्टीचा दुःख आहे की काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून आदरणीय शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली, अशी टीका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली. त्या लोकांना हे समजत नाही की, त्यांच्या अशा वागण्यामुळे एका बाजूला ते छत्रपती संभाजीराजेंना खोटे ठरवत आहे, तर दुसरीकडे ते शाहू महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात काही अंतर आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे असे करत आहेत त्यांच्या अशा वागण्याबद्दल आपल्याला प्रचंड दुःख असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
संभाजी राजे यांचे नेतृत्व गेल्या सहा वर्षांमध्ये चांगल्या प्रकारे तयार होत होते. मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा नेतृत्व तयार झाल्यानंतर आणि तेही पश्चिम महाराष्ट्रात तयार झाल्यानंतर त्याचे कुठलेही नुकसान भाजपला नाही. त्याचे नुकसान कोणाला आहे हे मी सांगण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लावला. संभाजी राजे यांचे नेतृत्व तयार होऊ नये या प्रकारचे प्रयत्न कोण करणार हे ज्याला कोणाला राजकारण कळते त्याला समजू शकते, असा सूचक इशार देत फडणवीस यांनी राष्ट्रवादीकडे बोट दाखवला.
एक गोष्ट स्पष्ट आहे की,जेव्हा आभार मानण्याकरिता छत्रपती संभाजी राजे मला भेटले त्याआधीच त्यांनी घोषणा केली होती की, ते कोणत्याही पक्षाची तिकीट घेणार नाही. त्यांनी स्वतंत्र उभे राहणार असे जाहीर करत आमच्याकडे अपक्ष म्हणून सर्व पक्षांनी (भाजप सह) पाठिंबा दिला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मी त्यांना सर्व पक्षांनी पाठिंबा दिला तर हायकमांडकडे सर्व माहिती मांडणार, असे आश्वासन दिले होते. काही लोक ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते नक्कीच उघडे पडतील, असे विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणालेत.
हेही वाचा -Navneet Rana : नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाल्या, "महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाला..."