नागपूर-ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांच्याकडे रेमडेसिविरचा साठा नसताना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. हे सरकारने रचलेले कुभांड होते, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच चौकशीला घाबरत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांवर दबाव निर्माण केल्याप्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कारवाईचे संकेत दिले आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते फार मॅच्युअर्ड आहेत. एवढेच मला त्यांना सांगायचे आहे. विरोधी पक्षाच्या आवाहानावर महाराष्ट्राला रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यास तयार झाल्याने त्यांच्यावर स्टोरी रचून कारवाई करण्यात आली. कुठलाही साठा नसताना, दखलपात्र गुन्हा नसताना बोलविण्यात आल्याची कबुली पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांना चॅलेंज आहे. रेमडेसिवीरचा साठा असेल तर सिद्ध करावे. तसेच चौकशीला भीत नाही. जनतेसाठी 36 गुन्हे अंगावर आहेत. गरज पडल्यास जनतेसाठी वाटेल त्या थरावर जाण्यास तयार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
हेही वाचा-'साठेबाजाला वाचवण्यासाठी भाजपा नेते जातात, याचा अर्थ काहीतरी काळेबेरे आहे'
नवाब मलिक यांच्यावर टिका
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे केंद्रावर आरोप कर आहेत. यावर बोलताना फडणवीस यांनी मलिक यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, की त्यांचे जावई यांच्यावर नार्कोटिक्स विभागाने कारवाई केली आहे. तेव्हापासून ते पिसाळल्याप्रमाणे केंद्रावर खोटे आरोप करत असतात.
हेही वाचा-कोण कळकळीने अन् कोण कळीने काम करतंय हे सर्वांना माहीत आहे, महापौर पेडणेकर यांची फडणवीसांवर टीका
रेमडेसेवीरसाठ्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्र्याला सांगितले होते की प्रशासन आणि महानगर पालिकेला हा साठा देणार आहे. भाजपने स्वतःसाठी रेमडेसिविरचा साठा मागितला नव्हता, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहणार असेही ते म्हणाले.