महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Independence day नागपुरात उपविभागीय कार्यलयात शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्यांक 12 बलुतेदार या सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना हे सरकार निश्चित राबवेल असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी व्यक्त केला तर नागपुरात उपविभागीय कार्यलयात Nagpur Sub Divisional Office उपमुख्यमंत्री फडणवीस Deputy Chief Minister Fadnavis यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

Deputy Chief Minister Fadnavis Hoisted
उपविभागीय कार्यलयात शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते

By

Published : Aug 15, 2022, 2:15 PM IST

नागपुर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारताचा अमृत काल सुरू झाला आहे. पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून आपल्याला बलशाली भारत तयार करायचा आहे. महाराष्ट्रातही नवीन आलेले सरकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये समाजातल्या सर्व लोकांना सोबत घेऊन एक मजबूत बलशाली आणि विकसित महाराष्ट्र तयार करेल. दिन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्यांक 12 बलुतेदार सर्वांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना हे सरकार निश्चित राबबेल असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस Deputy Chief Minister Fadnavis यांनी व्यक्त केला. नागपुरात उपविभागीय कार्यलयात Nagpur Sub Divisional Office शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.

नागपुरात उपविभागीय कार्यलयात शासकीय ध्वजारोहण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संपन्न


जास्तीत जास्त उद्योग विदर्भात आणता येईल भारत मातेला वंदन करत सर्व नाम आणि अनाम स्वतंत्र संग्राम सेनानी यांना नमन केरण्यात आले. भारतीय स्वतातंत्र्याच्या दिन चिरायू होवो म्हणत सर्वाना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करायचे आहे. पण विदर्भाचा जो मागे राहिलेला भाग आहे त्याला विकासाची गती दिली आहे. त्याचाही विकास करायचा आहे. मागील सरकारने पावर साबसिडी काढुन घेतली होती. या सर्वांसाठी मोठा प्रयत्न करून उद्योजकांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. जास्तीत जास्त उद्योग विदर्भात आणता येईल या माध्यमातून आमच्या विदर्भातील मुलाच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. विदर्भ हा शिक्षणाचा हब होत आहे. जिथे जिथे चांगले शिक्षण असते तिथे विकासाची दारे उघडे होतात. तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. तसेच विधीध उपायोजना राबवल्या जाईल. लोकांचा विकास होईल यासाठी प्रयत्न केले जाईल.



बलशाली महाराष्ट्र घडवण्याचे काम करायचेआपल्याला विकासाचे ध्येय ठेवत सगळ्या लोकांना सोबत घेऊन बलशाली महाराष्ट्र घडवण्याचे काम करायचे असल्याचे फडणवीस म्हणालेत. वीज पाणी आरोग्य शिक्षण या सोयी सुविधा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी काम वेगवेगळे योजनेच्या माध्यमातून केले जात आहे. तसेच विदर्भातील प्रकल्पांना गती देण्याचे काम पुढच्या काळात केले जाणार असल्याचेही फडणवीस म्हणालेत.

हेही वाचाIndian Independence Day स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी ध्वजारोहण

ABOUT THE AUTHOR

...view details