महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोड्या पाण्यातील चोरटी मासेमारी रोखण्यासाठी गस्ती नौका तैनात - minister sunil kedar news

गोडया पाण्याच्या तलावात मत्स्य निर्मितीसाठी करण्यासाठी सहकारी संस्थांशी करार केला जात आहे. पण याच तलावात चोरटी मासेमारी केली जाते.

nagpur
चोरटी मासेमारी रोखण्यासाठी गस्ती नौका तैनात

By

Published : Dec 22, 2020, 10:17 PM IST

नागपूर - गोडया पाण्याच्या तलावात मत्स्य निर्मितीसाठी करण्यासाठी सहकारी संस्थांशी करार केला जात आहे. पण याच तलावात चोरटी मासेमारी केली जाते. याला आळा घालण्यासठी राज्यातील पहिला प्रयोग म्हणून गस्ती नौका तैनात करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. नागपुरात फुटाला तलावात उपक्रमाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने आता चोरट्या मासेमारीला रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यावेंळी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी बोटीतून तलावाची पाहणी केली. शिवाय मच्छिमार समाजाच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करू असे ही सांगितले.

चोरटी मासेमारी रोखण्यासाठी गस्ती नौका तैनात

मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते उद्घाटन

यावेळी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री यांनी या तैनात करण्यात आलेल्या गस्त नौकेने तलावाची पाहणी केली. याचे उदघाटन नागपुरातील तेलंगखेडी (फुटाळा) येथे केले. हा तलाव पंचशील मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला करार करून देण्यात आला आहे. याठिकाणी या गस्त घालण्यासठी गस्त नौकीचे उदघाटन केले आहे. राज्यात सर्वत्र अशाच प्रकारच्या गस्ती नौका तलावात ठेवण्यात येणार आहे. तसेच ढिवर (मच्छीमार) समाजाचे प्रश्नांचा पाठपूरावा करुन त्यांना मदत करण्यात येईल, असेही मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गस्ती नौकांचे उद्घाटन

या गस्ती नौकेतून तलावाची पाहणी केली. पंचशील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश लोणारे, सामाजिक कार्यकर्ते नरु जिचकार, जिल्हा मजदूर संघाचे अध्यक्ष स्वप्नील लिखार, दिपक चव्हाण, नगर सेवक कमलेश चौधरी, शैलेंद्र अवस्थी, मुकेश चौधरी, राजा गोवाळे यावेळी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details