नागपूर -नागपूर शहर पोलीस दलातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. राज्य राखीव पोलीस बल भरती प्रक्रियेत घोटाळा ( CRPF Recruitment Scam In Nagpur ) झाल्याचे समोर आले आहे. राज्य राखीव पोलीस बलाच्या भरती प्रक्रियेत तीन उमेदवारांच्या जागी भलत्याच तीन (डमी) उमेदवारांनी लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी दिल्याचं उघड झाल्यानंतर एकूण सहा उमेदवारांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी नागपूर शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत असलेल्या नवीन कामठी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात नागपूर शहराचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तपास सुरू असल्याने आज बोलण्यास नकार दिला आहे. तपास पुढे जातो आहे, त्यामुळे उपयुक्त माहिती उपलब्ध झाल्यानंतर यावर बोलणार असल्याचे ते म्हणाले आहेत.
लेखी परीक्षेत बसवले डमी उमेदवार -
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूर शहर पोलीस दलातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी नागपूर शहर पोलिसांनी काही आरोपींना अटक झाल्यानंतर आणखी दहा उमेदवार पोलिसांच्या रडारवर असल्याचे आधीच स्पष्ठ केले आहे. पोलीस भरती घोटाळ्याचा तपास सुरू असताना आता एसआरपीएफ पोलीस भरती प्रक्रियेतही घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या महिन्यात दौड येथे राज्य राखीव पोलीस बल ७ च्या वतीने भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. नागपूरच्या कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज आणि एमआयडीसी हिंगणा परिसरातील प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या दोन ठिकाणी केंद्र देण्यात आले होते. यामध्ये काही उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. प्रत्यक्षात मूळ उमेदवाराच्या जागी दुसऱ्याच उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली, एवढेच नाही तर शारीरिक चाचणीत सुद्धा मूळ उमेदवारांच्या ऐवजी डमी उमेदवारांनी चाचणी देऊन भरघोस गुण मिळवली असल्याचे उघड झाले आहे.
सहा आरोपींवर गुन्हा दाखल -