नागपूर - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर अंकुश लावण्यासाठी राज्यशासनाने निर्बंध लागू केले आहेत. नागपूर जिल्ह्यातही आज (सोमवार) रात्रीपासून निर्बंध ( covid 19 restriction in nagpur ) लागू करण्यात आले आहेत. यात सकाळी जमावबंदी असणार असून रात्रीपासून पहाटे पर्यंत अत्यावश्यक कामशिवाय बाहेर फिरण्याची मनाई असणार आहे. यात मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आदेश काढत निर्बध लागू केले आहेत.
हेही वाचा -Arrested with Gold Biscuits : नागपूर रेल्वे स्थानकातून सोन्याच्या बिस्कीटासह एकाला अटक
'या' वेळेत राहणार जमावबंदी आणि संचारबंदी
नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढली असताना नवीन व्हेरीएंट ओमायक्रॉन बाधितांचे रुग्ण मिळून येत आहेत. त्यामुळे नागपूर शहरात आज संध्याकाळपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात सकाळी 5 ते संध्याकाळी 11 पर्यंत जमावबंदी असणार असून, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक कामशिवाय बाहेर पडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे.
'ही' आस्थापने 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
निर्बंधामध्ये हॉटेल, रेस्टॉरेंट, मल्टिप्लेक्स, मॉल, चित्रपट गृह, सलून हे केवळ 50 टक्के क्षमतेने कोविड नियमांचे पालन करून सुरू ठेवता येईल. स्विमिंगपूल आणि वेलनेस सेंटर मात्र बंद ठेवावे लागणार आहे.
शासकीय कार्यलयात 'हा' नियम पाळावा लागेल