नागपूर: मिनकॉन कॉन्फरन्समध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. एवढंच नाही तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. सरकारी अनास्था किती असू शकते, याचं उदाहरण देताना ते म्हणाले की देशभरात रस्त्याचं जाळं विणताना स्वतःच्या घरासमोरील 2 किलोमीटरचं रस्त्या तयार करायला ११ वर्ष लोटली.
देश विकसित कसा होईलमात्र,अजूनही रस्त्या निर्माण करू शकलो नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. आज ते अधिकारी माझ्यासमोर येतात, तेव्हा त्यांचे चेहरे बघून मला लाज वाटते. कारण दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३० बैठका घेतल्या आहेत. अगदी स्पष्ट बोलण्यात मला कोणतीही अडचण नाही, पण असेच सुरू राहील तर देश विकसित कसा होईल, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विचारला आहे.