महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सलग दुसऱ्या दिवशीही आयुक्त तुकाराम मुंढे विरोधात नगरसेवकांचा रोष कायम - तुकाराम मुंढे विरुद्ध नगरसेवक

नागपूर महानगरपालिकेच्या सभेत सलग दुसऱ्या दिवशीही सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारभारा विरोधात रोष व्यक्त केला आहे.

Nagpur Commissioner Tukaram Mundhe
नागपूर आयुक्त तुकाराम मुंढे

By

Published : Jun 24, 2020, 10:24 PM IST

नागपूर - महानगरपालिकेच्या सभेत सलग दुसऱ्या दिवशीही सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारभारा विरोधात रोष व्यक्त केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या सभात्यागामुळे शनिवारी स्थगित करण्यात आलेली नागपूर महापालिकेची सभा मंगळवारपासून सुरू झाली आहे. काल (सोमवार) आणि आज (मंगळवार) अशा सलग दोन्ही दिवशी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नगरसेवक नितीन साठवणे यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, याविषयी मंगळवारी सभागृहात स्थगन प्रस्ताव सादर करण्यात आला होता. कोरोनाच्या या संकट काळात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले. शहरातील विकासकामे स्थगित करण्यात आली. आयुक्त मुंढे नगरसेवकांचे ऐकत नाही, असा सूर आजही स्थगन प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांचा होता.

नागपूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा...

हेही वाचा...संतापजनक: सावकाराच्या पत्नीकडून शेतकऱ्याच्या पत्नीला अर्धवस्त्र करुन धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल

एकूण 25 नागरसेवकांनी स्थगन प्रस्तावावर चर्चा केली. त्यामध्ये सर्वपक्षीय नागरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. तर केवळ काँग्रेसच्या दोन नगरसेवकांनी मुंढे यांना समर्थान दिल्याचे पहायला मिळाले. शनिवारची सभा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या सभात्यागामुळे गाजली होती. त्यामुळे काल (सोमवार) आयुक्त सभेला येणार की नाही, याविषयी चर्चा होती. परंतु, सलग दोन्ही दिवस आयुक्तांनी सभेला हजेरी लावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details