नागपूर -कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सध्या आपल्या देशात कोवीशिल्ड आणि कोवॅक्सीन सारखी प्रभावी लस उपलब्ध झाली आहे. यामध्ये 18 वर्षांपुढील नागरिकांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मात्र 18 वर्षाखालील मुलांना सुरक्षित करण्यासाठी भारताची पहिल्या स्वदेशी एमआरएनए (MRNA) कडून लसीच्या चाचणीला सुरुवात होत आहे. MRNA कोवीड पुणे येथील जेनोव्हा बायॉफार्मासिटिकलने विकसित केली असून त्याच्या 2/3 चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 5 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची परवानगी भारतीय औषध नियमकांकडून देण्यात आली आहे. त्यानुसार 20 एप्रिल पासून नागपूर येथील मेडीट्रीना हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये 20 मुलांना mRNA कोवीड लसीचा पहिला डोस देण्यात येणार असल्याची माहिती डॉ संदीप मोगरे यांनी दिली आहे.
भारतात निर्मित पहिल्या एमआरएनए आधारित "जेमकोवॅक" -प्रतिबंधात्मक स्वदेशी लसीची चाचणी नागपुरात करण्यात येणार आहे. विशेषत: पाच ते 18 वर्षे वयोगटातील मुलांकरिता वॅक्सिंग ट्रायल होणार आहे. पुणे येथील जेनोव्हा बायो फार्मासिटिकल्सने आतापर्यंत मानवी चाचण्यांचा दोन तृतीयांश टप्पा पूर्ण झालेला आहे. ट्रायच्या फेज 1 व फेज 2 चाचण्यांमध्ये चार हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. आता कंपनीला पाच ते अठरा वर्षापर्यंतच्या वयोगटाच्या चाचणीला डीसीजीआय तर्फे मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार या ट्रायल आता सुरू होणार आहेत.