नागपूर -कोरोनाच्या तीसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तीसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका हा लहान मुलांना बसणार असल्याचा देखील अंदाज तज्ज्ञांनी वक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर आता 2 ते 18 वयोगाटातील मुलांचे देखील लसीकरण करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भारत बायोटेक, एनायव्ही आणि आयसीएमारच्या माध्यमातून देशातील चार ठिकाणी लहान मुलांवर कोरोना लसीकरणाचे ट्रायल होणार आहे. यामध्ये नागपूरचा देखील समावेश आहे.
नागपुरातील मेडिट्रीना या रुग्णालयात लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खडतकर, मेडिट्रीना रुग्णालयाचे संचालक डॉ. समीर पालतेवार आणि मेडिट्रीना ट्रायलचे संचालक डॉ. आशिष ताजने यांची उपस्थिती होती.
देशात चार ठिकाणी होणार मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी
नागपूरसह, पटना, दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी देशभरातून 2 ते 18 वयोगटातील 525 मुलांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात आलेल्या मुलांचे 175 प्रमाणे तीन गट करण्यात येणार आहे. पहिला गट हा 2 ते 6 वर्षांच्या बालकांचा असणार आहे, दुसरा गट हा 6 ते 12 वर्षांच्या बालकांचा तर तिसरा गट हा 12 ते 18 वर्षांच्या मुलांचा असणार आहे. अशी माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. साधारण पणे 208 दिवस हे ट्रायल चालणार असून, यामध्ये पहिली लस दिल्या नंतर लसीचा दुसरा डोस हा 28 दिवसांनंतर देण्यात येणार आहे. या चाचणीसाठी ज्या मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास नाही, ज्यांना यापूर्वी कधीही कोरोना झालेला नाही अशा मुलांची निवड करण्यात येणार आहे.
हेही वाचा -'बार्ज पी३०५' LIVE Updates : मृतांची संख्या ५१ वर; २३ जणांची ओळख पटली..