महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरातील मेयो रुग्णालयात कोरोना टेस्टिंग मशीन पडली बंद - covid 19 test machine

नागपूरच्या मेयो रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी एक मशीन कार्यरत आहे. मात्र, 24 तास ही मशीन सुरू असून दररोज या मशीनवर सुमारे 80 ते 90 नमुने तपासण्यात येत असल्याने ताण आल्यामुळे ही मशीन बंद पडली आहे.

Corona testing machine
कोरोना टेस्टिंग मशीन पडली बंद

By

Published : Apr 4, 2020, 12:02 AM IST

नागपूर - येथे कोरोना टेस्टिंगसाठी असलेली मशीन शुक्रवारी अचानक बंद पडल्याने एकच तारांबळ उडाली आहे. नागपूरच्या मेयो रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी एक मशीन कार्यरत आहे. मात्र 24 तास ही मशीन सुरू असून दररोज या मशीनवर सुमारे 80 ते 90 नमुने तपासण्यात येत असल्याने ताण आल्यामुळे ही मशीन बंद पडली आहे.

संपूर्ण विदर्भ, मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथूनही नमुने इथे तपासल्या जात आहेत. परंतु, शुक्रवारी ही मशीन अचानक बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची एकच धावपळ झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नमुने तपासणी केल्याने मशीनवर ताण आल्यामुळे मशीन बंद पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्य मशीन बंद पडल्यावर मेयोमध्ये असलेल्या दुसऱ्या कमी क्षमतेच्या मशीनवर कोरोना नमुने तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नागपूरच्या मिहान येथील एम्समध्ये प्रशासनाने तातडीने कोरोना नमुने तपासणी यंत्र सुरू केले असल्याची माहिती समोर आली आहे. एम्समधील विषाणू चाचणी मशीन ही अद्ययावत असून अधिक क्षमतेची असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे मेयो येथील मशीन लवकरच दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details